जरा थांबा, कांदा हसविणार आहे; शेतकऱ्यांना जाणकारांचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

onion prices are likely to rise in the near future experts say

जरा थांबा, कांदा हसविणार आहे; शेतकऱ्यांना जाणकारांचे आवाहन

कोकणगाव (जि. नाशिक) : कांद्याच्या भावात गेल्या आठवड्यापासून रोज एक ते दोन रुपयांनी वाढ होत आहे. अचानक जास्त तेजीपेक्षा रोज एक ते दोन रुपयांनी होणारी भाववाढ स्थायी किंवा दीर्घकाळ टिकणारी असते. त्यामुळे कांद्याचे दर आगामी काळात तेजीत राहण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.


सध्या जुना उन्हाळ कांदा जवळपास तीस टक्के शिल्लक आहे. परंतु खराब होण्याचे प्रमाण दरवर्षी-पेक्षा जास्त आहे. नवीन लाल कांद्याचे आगार नांदगाव, मालेगाव, सटाणा, साक्री, धुळे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नवीन लागवड तसेच रोपांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. हीच परिस्थिती राजस्थान, मध्येप्रदेश आणि दक्षिण भारतात पण आहे. यामुळे मागील पुरवठा निर्देशांक पाहता महिनाभर पुरेल इतका माल शिल्लक असताना दोन ते तीन महिन्याची मागणी भागवावी लागणार असल्याने तुटवडा निर्माण होऊन बाजारभाव हमखास वाढण्याची स्थिती आहे. येत्या काळात पाच हजाराचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी मालाची प्रत बघून टप्याटप्याने विक्री करावी असे आवाहन कांदा व्यापारी दीपक लोकनार यांनी केले आहे.

हेही वाचा: गिरणा धरण ७० टक्के भरले! पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण


आपल्या रोजच्या आहारातील महत्त्वाचा घटक म्हणजे कांदा, मागील आठवड्यापासून कांद्याच्या दरामध्ये हळूहळू का होईना पण दरात वाढ होत आहे. हे दर स्थिर राहत आहे, येणाऱ्या काळात नक्कीच कांद्याचे भाव वाढणार आहेत यात काही शंका नाही.
- दीपक लोकनार, कांदा व्यापारी, पिंपळगाव बसवंत.

हेही वाचा: वृद्ध शेतकऱ्याची कुऱ्हाडीने वार करुन हत्या, परिसरात खळबळ

loading image
go to top