esakal | कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसवरून आमदार राहुल ढिकले आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Rahul Dhikale

कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसवरून आमदार राहुल ढिकले आक्रमक

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन महिना पूर्ण झाल्यानंतरही ज्येष्ठ नागरिकांना दुसरा डोस उपलब्ध होत नसल्याने मोठ्या प्रमाणात फरफट होत आहे. या पार्श्वभूमीवर पूर्व विधानसभा मतदार आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी आक्रमक भूमिका घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांच्याकडे तातडीने कोव्हॅक्सिन डोस (Covaxin Vaccin) उपलब्ध करून देताना प्राधान्याने दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्याची मागणी केली आहे. (MLA Rahul Dhikale took an aggressive stance from the second dose of covaxin)


नाशिक शहरामध्ये आठवड्यापासून लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. आत्तापर्यंत शहरात तीन लाखांहून अधिक कोव्हॅक्सिन व कोव्हिशील्डचे डोस देण्यात आले आहे. कोव्हॅक्सिनचे प्रमाण अत्यल्प आहे. पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात पुरवठा झाला, त्यावेळी नागरिकांना कोव्हॅक्सिनचे डोस देण्यात आले. मात्र दुसऱ्या टप्यात कोव्हॅक्सिनचे डोस अपुरे येत आहे. महापालिकेला दोन दिवसापूर्वी साडेचार हजार डोस प्राप्त झाले, मात्र ते संपुष्टात येत आहे. तसेच १८ ते ४४ वयोगटासाठी ते डोस बंधनकारक केले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी यापूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांना महिना उलटूनही डोस मिळत नसल्याने पहिल्या डोसचा प्रभाव नष्ट होण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने कोव्हॅक्सिनचे डोस तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे आमदार ढिकले यांनी केली आहे.


कोव्हॅक्सिनच्या तुटवड्यामुळे यापूर्वी ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस मिळत नाही. परिणामी अनेक नागरिकांना केंद्रावरून परत जावे लागत आहे. शासनाने तातडीने दखल घेऊन डोस उपलब्ध करून द्यावे.
- ॲड. राहुल ढिकले, आमदार.

हेही वाचा: नाशिक-औरंगाबाद सीमेवर पोलिसांकडूनच ई-पासची तपासणी; आरोग्य तपासणी नाहीच