esakal | नाशिक-औरंगाबाद सीमेवर पोलिसांकडूनच ई-पासची तपासणी; आरोग्य तपासणी नाहीच
sakal

बोलून बातमी शोधा

nashik-aurangabad highway

नाशिक-औरंगाबाद सीमेवर पोलिसांकडूनच ई-पासची तपासणी; आरोग्य तपासणी नाहीच

sakal_logo
By
संतोष घोडेराव

अंदरसूल (जि.नाशिक) : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची (corona infected) संख्या झपाट्याने वाढू लागल्याने राज्य सरकारने जिल्हाबंदी (lockdown) केली खरी, पण नाशिक-औरंगाबाद (highway checking) या दोन्ही जिल्ह्यांच्या मध्यावर असलेल्या येवला तालुक्यातील खामगाव येथील सीमेवर आरोग्य तपासणी न करता फक्त ई-पासचीच (e-pass) तपासणी करून वाहने सोडली जात असल्याचा प्रकार समोर आला. (Police check e-pass at Nashik-Aurangabad border)

हेही वाचा: कोरोनामुक्त झाल्यानंतरही निष्काळजीपणा नको! हृदयविकाराचा, पक्षाघाताचा धोका

यावर ‘छुप्या मार्गाने ये-जा चाललीय’ हे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होऊनही प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे खामगाव सीमेवर अजूनही एकही शिक्षक, आरोग्य कर्मचारी तपासणी करताना दिसत नाहीये. सुरवातीपासून पोलिसच ड्यूटी निभावत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे औरंगाबादकडे जाणाऱ्या वाहनांचे प्रमाण अल्प असले तरी वैद्यकीयच्या नावाखाली वैजापूरहून येवल्याकडे उपचारासाठी येणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. सीमाबंदीच्या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात कुमकही दिसत नाही.

हेही वाचा: हद्दीच्या वादात जळगाव-नाशिक सीमेवरील अमोदेफाटा चेकस्टपोट प्रश्न रेंगाळला?