esakal | ''आयटी पार्क महत्त्वाचा, नाशिकमध्ये विमाननिर्मितीही शक्‍य''; आमदार रोहित पवारांचा युवकांशी संवाद 
sakal

बोलून बातमी शोधा

rohit pawar at nashik.jpg

नाशिकच्‍या विकासाच्‍या दृष्टीने आयटी पार्कचा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. किंबहुना नाशिकमध्ये विमाननिर्मितीलाही वाव आहे. उद्योगाच्‍या विकासासाठी युवकांनीच पुढाकार घ्यायला हवा. तसेच नवतंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्याची आवश्‍यकता आमदार रोहित पवार यांनी व्‍यक्‍त केली.

''आयटी पार्क महत्त्वाचा, नाशिकमध्ये विमाननिर्मितीही शक्‍य''; आमदार रोहित पवारांचा युवकांशी संवाद 

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : नाशिकच्‍या विकासाच्‍या दृष्टीने आयटी पार्कचा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. किंबहुना नाशिकमध्ये विमाननिर्मितीलाही वाव आहे. उद्योगाच्‍या विकासासाठी युवकांनीच पुढाकार घ्यायला हवा. तसेच नवतंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्याची आवश्‍यकता आमदार रोहित पवार यांनी व्‍यक्‍त केली. रविवारी (ता. २७) कॉलेज रोडवरील चाय टपरी येथे झालेल्‍या ‘कॉफी विथ दादा’ या उपक्रमात सहभागी होताना त्‍यांनी युवक-युवतींशी मनसोक्‍त गप्पा मारल्या. 

आमदार रोहित पवार - ‘कॉफी विथ दादा’मध्ये साधला युवकांशी संवाद 
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्‍या ग्रामीण कार्यकारिणीतर्फे झालेल्‍या या कार्यक्रमात युवकांनी विविध प्रश्‍नांच्‍या माध्यमातून श्री. पवार यांचा दृष्टिकोन जाणून घेतला. या वेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नंदन भास्‍करे, श्रेयांश सराफ यांच्‍यासह पदाधिकारी उपस्‍थित होते. केवळ लोकप्रिय राजकारणी, उद्योजक किंवा व्यक्तिमत्त्वांना आदर्श मानण्यापेक्षा प्रत्‍येक व्‍यक्‍तीतील वेगळेपण शोधले पाहिजे. राजकारणात यायचे असेल, तर युवकांनी महाविद्यालयातील शिपायांनादेखील आदर्श समजायला हवे. इतरांची नक्‍कल करण्यापेक्षा स्‍वतःची शैली विकसित करण्याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. 

उद्योगाच्‍या विकासासाठी युवकांनीच पुढाकार घ्यायला हवा
पवार म्‍हणाले, की राज्‍यात होणाऱ्या प्रत्‍येक गुन्ह्या‍ची नोंद पोलिसांकडून घेतली जात असल्‍याने, गुन्‍हेगारीत वाढ होत असल्‍याची चर्चा होते. परंतु अन्‍य राज्‍यांच्‍या तुलनेत महाराष्ट्रात महिला अधिक सुरक्षित आहेत. आगामी दोन महिन्‍यांत शक्‍ती कायदा मंजूर होणार असल्‍याने यातून महिलांना अधिक सुरक्षित वातावरण निर्माण होईल, असा विश्र्वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला. प्रत्‍येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी महाविकास आघाडी कटिबद्ध असल्याचेही सांगितले. 
 
सेल्‍फीसाठी तरुणाईची धडपड 
कार्यक्रमादरम्‍यान जमलेल्‍या युवकांना आमदार रोहित पवार यांच्‍यासोबत सेल्‍फी काढण्यासाठी चांगलीच धडपड करावी लागली. या वेळी झालेल्‍या गर्दीमुळे आयोजकांना यासंदर्भात ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना द्यावी लागली. तरीदेखील युवकांचा जमाव ऐकत नसल्‍याने आमदार पवार यांनी संताप व्‍यक्‍त करत युवकांना सुनावले.  

loading image