Satyajeet Tambe | माझा विजय हा पदवीधरांच्या सद्सद्विवेकबुद्धीचा विजय : आमदार सत्यजित तांबे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Secretary Pramoddada Patil, Subhash Nikam, Prasad Patil etc. while felicitating MLA Satyajit Tambe.

Satyajeet Tambe | माझा विजय हा पदवीधरांच्या सद्सद्विवेकबुद्धीचा विजय : आमदार सत्यजित तांबे

येवला (जि. नाशिक) : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात माझा झालेला विजय हा या मतदारसंघातील सद्सद्विवेकबुद्धीच्या पदवीधरांचा विजय आहे.

माजी आमदार सुधीर तांबे यांचा मतदारसंघाचा गौरवशाली असा वारसा असून, मी या पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधरांच्या ज्या विविध समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी जीवाचे रान करील, असे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले. (MLA Satyajeet Tambe statement about victory victory of graduates election nashik news)

आमदार तांबे यांनी येवल्यासह नगरसूल, सायगाव येथे विविध शाळा व पदाधिकाऱ्यांच्या भेट घेऊन आभार मानले. येथील समता प्रतिष्ठानच्या मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयात आभार दौऱ्याच्या निमित्ताने भेट दिली, त्या वेळी ते बोलत होते. समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे अध्यक्षस्थानी होते. आमदार तांबे यांचा मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयाचे गौरवचिन्ह देऊन सत्कार झाला.

समाजातील शिक्षक, डॉक्टर्स, वकील, इंजिनिअर आदी पदवीधर ठामपणे माझ्या पाठीशी ठामपणे राहिल्यामुळेच मला आज ही विजयश्री मिळाल्याचे आमदार तांबे म्हणाले. शिक्षकांच्या खूप समस्या असून, विशेषतः शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेल्या नव्या जीवघेण्या समस्या सोडवण्यासाठी काम करणार असल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले.

अर्जुन कोकाटे यांनी शिक्षकांचा समस्या मांडून त्या कृतियुक्त पद्धतीने सोडविण्याची गरज असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन महाराजा सयाजीराव गायकवाड कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ओंकार बिडवे यांनी केले.

समता प्रतिष्ठानचे सरचिटणीस दिनकर दाणे यांनी आभार मानले. कैलास देशमुख, संदीप मोरे, प्रा. एम. पी. गायकवाड, गणेश गाडे, रामनाथ पाटील, कानिफ मढवई, नवनाथ शिंदे, जी. एल. जाधव, बाबासाहेब कोकाटे, कविता झाल्टे, सलील पाटील, बाबासाहेब शिंदे, सागर दिघे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

★ पाटील यांच्या निवासस्थानी भेट!

आमदार तांबे यांनी आभार दौऱ्यानिमित्त नगरसूल येथील जेष्ठ नेते, माजी सरपंच प्रा. प्रमोद पाटील यांच्या निवासस्थानी भेट देत आभार मानले. या वेळी प्रा. पाटील तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते आमदार तांबे यांचा सत्कार झाला.

शिक्षक व पदवीधरांसाठी कायम बरोबर राहून त्यांचे प्रश्न धसास लावण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील, असा शब्द आमदार तांबे यांनी दिला. प्रा. प्रमोददादा पाटील, माजी सरपंच सुभाष निकम, माजी सरपंच प्रसाद पाटील, प्रा. एम. पी. गायकवाड, कैलास देशमुख, ऋषीकेश पाटील, विनोद पाटील, संदीप मोरे, पांडुरंग घुगे आदी उपस्थित होते. तांबे यांनी सायगव येथील सरस्वती विद्यालयालाही भेट दिली. मुख्याध्यापक सी. बी. कुळधर यांनी स्वागत केले. स्वामी मुक्तानंद शिक्षण संकुलालाही भेट देऊन तांबे यांनी आभार मानले.

टॅग्स :NashikSatyajeet Tambe