Nashik News : बडा कब्रस्तान भागात विविध कामांना सुरवात; 70 लाखांचा निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Maulana Mufti Ismail starting the installation of 183 LED lights in Theil Bada cemetery area on Sunday. Officials of Neighbors Cemetery Trust.

Nashik News : बडा कब्रस्तान भागात विविध कामांना सुरवात; 70 लाखांचा निधी

मालेगाव (जि. नाशिक) : येथील बडा कब्रस्तानमध्ये ७० लाख रुपये खर्च करून एलईडी दिवे, काँक्रिटीकरण, जनाजा हॉल, दोन मोठे फोकस बसविले जाणार आहेत. आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, या ठिकाणी एलईडी दिवे बसविण्याच्या कामास नुकतीच आमदार मौलाना मुफ्ती यांच्या हस्ते सुरवात करण्यात आली. (Various works started in Bada Kabrastan area 70 lakh fund Nashik News)

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

येथील बडा कब्रस्तानमधील दिवे व रस्ते खराब झाले होते. रात्री येथे दफन विधीसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होत होता. तसेच कब्रस्तानातील काही रस्ते खराब झाले आहेत. त्या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे.

शहरातील कब्रस्तान व विकासकामांसाठी हा निधी खर्च केला जाईल. शहरात अल्पसंख्याक विभागातर्फे दोन कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. त्या निधीतून बडा कब्रस्तान, आयशानगर व शहरातील अन्य कब्रस्तानांमध्ये काम केले जाणार आहे.

बडा कब्रस्तानमध्ये १८३ एलईडी दिवे बसविले जाणार आहेत. शब-ए-बारातपर्यंत सर्व दिवे बसविले जातील. तसेच ब्लॉक, रस्त्याची कामेही केली जाणार आहेत. या वेळी ॲड. हमीद लोधी, इलियास काबूल, मलिक भद्रा, अन्सारी लुकमान, हाफिज अब्दुलाह, हुसेन अन्सारी आदी उपस्थित होते.

टॅग्स :MalegaonNashikDevelopment