नांदगावच्या हद्दवाढीसाठी आमदार कांदेंचे नगरविकासमंत्र्यांना साकडे

Nandgaon
Nandgaonesakal

नांदगाव (जि. नाशिक) : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या हद्दवाढीची कोंडी सुटण्याची चिन्हे आता दृष्टीक्षेपात दिसू लागल्याने नागरिकांच्या अपेक्षा आता पुन्हा एकदा उंचावल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या विधिमंडळाच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात आमदार सुहास कांदे यांनी नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची त्यांच्या दालनात भेट घेत नांदगाव पालिकेच्या हद्दवाढीची मागणी केली. आमदार कांदे यांच्या मागणीची दखल घेत मंत्री शिंदे यांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना त्याबाबत अवगत करताना मागणी तपासून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनाक्रमांमुळे पालिकेच्या शताब्दी वर्षात हद्दवाढीच्या प्रश्‍नाला चालना मिळून अंतिम मूर्त स्वरूप मिळण्याची शक्यता मात्र निर्माण झाली आहे.

Nandgaon
नाशिक : नदी प्रदूषण मुक्तीसाठी; कोविड सेंटरमधील ऑक्सिजन प्लांट

शहराच्या शून्य किमी अंतरातच निर्माण करण्यात आलेल्या सहा ग्रामपंचायतीचे पालिकेत विलनीकरण व्हावे, या मागणीसाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेने एकमताने मंजुरीचा ठराव सर्वसहमतीने मंजूर केला होता. गिरणानगर व श्रीरामनगर या ग्रामपंचायतींनी पालिका हद्दीत सहभागी होण्यासाठी ग्रामसभेचा ठराव मंजूर केला. तर फुलेनगर, क्रांतीनगर, मल्हारवाडी, गंगाधरी या ग्रामपंचायतींनी विरोध केला. दरम्यानच्या काळात संबंधित ग्रामपंचायती व पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नव्या प्रभाग रचना आराखड्याचे काम सुरूही झाले होते. त्यामुळे हद्दवाढीचे काय होणार, अशी चर्चा सुरु झाली होती. नगरविकास विभागाने शहराच्या हद्दवाढीवर काम सुरु केल्याने नागरिकांच्या अपेक्षा मात्र वाढल्या आहेत.
मंगळवारी (ता. १५) आमदार सुहास कांदे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शून्य किमी अंतरावरील ग्रामपंचायतींचा समावेश पालिका क्षेत्राच्या हद्दीत करण्याची मागणी केली. त्यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुकूलता दर्शवत मागणी तपासून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्या आहेत. दरम्यान, शासनस्तरावर संभाव्य हद्द वाढीचा प्रस्ताव यापूर्वीच दाखल झाला असल्याने शासनाच्या निर्णयाकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

अंतिम आराखडा तयार करणार

आता नगर विकास विभागाने संभाव्य हद्दवाढीच्या दृष्टीने भौगालिक सीमांकन नकाशा चतुःसीमा नगर भूमापन क्रमांक प्रॉपर्टी कार्ड एकूण महसुली क्षेत्र त्यापासूनचे उत्पन्न झालेली विकासकामे व त्यासाठी निधीचा झालेला विनियोग व रखडलेली अपूर्ण कामे या सगळ्या बाबींवर माहिती संकलन करण्यात येऊन अंतिम आराखडा तयार करण्यात येणार आहे.

Nandgaon
शालेय पोषण आहाराचा तांदूळ घोटाळा विधानसभेत

''शुन्य किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्रामपंचायतींचे नगरपरिषदेमध्ये विलीनीकरण करून हद्दवाढ झाल्यास ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देता येणार आहे. तसेच, रहिवाशांचे राहणीमान देखील उंचावणार आहे.'' - सुहास कांदे, आमदार, नांदगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com