नाशिक : कोरोना मदतीसाठी दहा लाखांची लाच

मनसेचा आरोप; चौकशीच्या सूचना
MNS Allegations Corona to help bribe of ten lakhs
MNS Allegations Corona to help bribe of ten lakhssakal

नाशिक : कोरोनामुळे मृत्यूमुखी (corona Death) पडलेल्या फ्रंटवर्करच्या नातेवाइकांना पन्नास लाख(Fifty lakhs) रुपयांची मदत मिळवून देण्यासाठी महापालिकेतील वैद्यकीय विभागातील (Medical department) एका कर्मचाऱ्याने दहा लाख रुपये लाच मागितल्याचा आरोप मनसेचे (MNS) नगरसेवक सलीम शेख यांनी महासभेत केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना महापौर सतीश कुलकर्णी (Mayor Satish Kulkarni) यांनी दिल्या.

राज्य शासनाने कोरोनाकाळात फ्रंटवर्कर म्हणून काम केलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांना पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली.

MNS Allegations Corona to help bribe of ten lakhs
अकोला : आयुक्त, जिल्हाधिकारी कारवाईच्या टप्प्यात!

योजना जाहीर झाल्यानंतर त्याचा गैरफायदा घेणारे अनेकजण पुढे आल्याचा प्रकार महासभेत नगरसेवक शेख यांनी समोर आणला. वैद्यकीय विभागातील पवार नामक एका कर्मचाऱ्याने मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांना पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली. शासनाकडून प्राप्त होणाऱ्या मदतीसाठी महापालिकेकडून पाठपुरावा करण्यासाठी दहा लाख रुपयांची लाच मागण्यात आल्याचे शेख यांनी निदर्शनास आणले. यासंदर्भात चौकशीच्या सूचना दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com