MNSचे राजदूत करणार निवडणुकीचा पाया भक्कम; राज ठाकरे पुढील महिन्यात दौऱ्यावर

Raj Thackeray latest marathi news
Raj Thackeray latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्या तयारीचाच एक भाग म्हणून मतदारयादीनिहाय जवळपास ७०० राजदूत नियुक्त करण्याच्या सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. १२) पदाधिकाऱ्यांना दिल्या.

त्याचप्रमाणे संघटना बळकटीकडे लक्ष देताना पुढील महिन्यात नाशिक दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (MNS ambassador will make election foundation strong Raj Thackeray on tour next month Nashik Latest Political News)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी लक्ष घातले आहे. विशेष करून नाशिक व पुणे या दोन शहरांमध्ये संघटना बळकटीकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.

मागील आठवड्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी नाशिकचा दौरा केला. या वेळी महाविद्यालयांमध्ये थेट युवकांशी संवाद साधण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.

त्यानुसार अमित ठाकरे यांनी चार दिवसांचा दौरा आपटून राज ठाकरे यांना अहवाल दिला. या पार्श्वभूमीवर मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम, शहर समन्वयक सचिन भोसले व पक्षाचे प्रवक्ते पराग शिंत्रे यांना मुंबईत बोलविण्यात आले होते.

निवासस्थानी झालेल्या भेटीत राज ठाकरे यांनी नाशिकमधील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. निवडणुका कधी होतील, या भानगडीत न पडता पक्षाचा प्रचार व ध्येय धोरणे मतदारांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

संघटना बळकट करताना सक्रिय नसलेल्या पदाधिकाऱ्यांना हटवून त्यांच्या जागी अन्य पदाधिकाऱ्यांना संधी देण्याची सूचना त्यांनी केली. पुढील महिन्यात नाशिक दौऱ्यावर ते स्वतः येणार आहेत. या वेळी संघटनात्मक आढावा घेतला जाणार असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली.

Raj Thackeray latest marathi news
Dhule : देवभाने धरण सलग चौथ्या वर्षी ओसांडले

सातशे राजदूत नियुक्त करणार

महापालिका निवडणुकीसाठी शहरात ३१ प्रभाग तूर्त आहेत. हजार मतदारांमागे एक यादीनुसार जवळपास ७०० मतदारयाद्या सद्यस्थितीत आहेत. प्रत्येक यादीमागे एक राजदूत नियुक्त करून त्याद्वारे प्रचार व प्रसाराचे तंत्र आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यानुसार शहरात ७०० राजदूत नियुक्त होऊन मनसेचा गड भक्कम करतील.

Raj Thackeray latest marathi news
निमगूळला विठ्ठल रुक्मिणी पालखी मिरवणुक; 100 वर्षांपूर्वीची परंपरा कायम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com