esakal | मनसे काळातील प्रकल्प ऊर्जितावस्थेत आणणार | Nashik
sakal

बोलून बातमी शोधा

nashik

मनसे काळातील प्रकल्प ऊर्जितावस्थेत आणणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सत्ताकाळ नाशिककरांनी अनुभवला आहे. सामाजिक दायित्वाच्या निधीतून मनसेने उभारलेल्या प्रकल्पांची सत्तांतरानंतर वाताहात झाली आहे. त्यामुळे सत्ता आल्यास मनसेच्या प्रकल्पांना ऊर्जितावस्था आणण्याबरोबरच पार्किंगचा प्रश्‍न सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल. पांजरपोळच्या जागेवर आयटी पार्क, तर सुरक्षेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी मनसेचे पदाधिकारी त्यांच्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहेत, असे आश्‍वासन मनसेच्या शिष्टमंडळाने बुधवारी (ता. १३) दिले.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी ऑगस्ट महिन्यात सहा विभागांमध्ये विशेष मोहीम राबविली. मोहिमेंतर्गत महिला व युवकांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा नाशिककरांच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आल्या. नाशिककरांच्या जाहीरनाम्याचा अहवाल मनसेच्या शिष्टमंडळाकडे सुपूर्द करण्यात आला. नाशिककरांच्या जाहीरनाम्याचे स्वागत करताना शहर विकासासाठी व्यक्त केलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्याचे आश्‍वासन शिष्टमंडळाने दिले. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी भूमिका स्पष्ट केली. मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर, जिल्हाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम, अंकुश पवार, समन्वयक सचिन भोसले, सातपूर प्रभाग समिती सभापती योगेश शेवरे, विभाग अध्यक्ष योगेश लभडे, सत्यम खंडाळे, शहर उपाध्यक्ष सचिन सिन्हा, जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य बोडके, शाखाध्यक्ष सचिन सांगळे, जितेंद्र कुलथे, राहुल सहाणे, विनोद यादव उपस्थित होते.

हेही वाचा: पुनूमियाची सिन्नरमध्ये जमीन; परमबीर सिंग यांच्याशी संबंध असल्याची चर्चा

शहराध्यक्ष दातीर म्हणाले, की मनसेची सत्ता आल्यास स्पोर्ट्‌स हबला प्रधान्य देऊ. पर्यटनाला चालना मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करू. पांजरपोळच्या जागेवर आयटी हब करण्यासाठी मनसेचे प्रयत्न राहतील. किमान वेतन कायद्यानुसार औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांना वेतन मिळण्यासाठी प्रयत्न करू.

जिल्हाध्यक्ष अंकुश पवार म्हणाले, की मराठी तरुणांना रोजगार मिळविण्यासाठी मनसेचे सातत्याने प्रयत्न आहेत. आता कंपनी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळविण्यासाठी मोहीम राबवू. समन्वयक सचिन भोसले म्हणाले, की सुशिक्षित विद्यार्थ्यांना अधिकारी बनण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे उभारू. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सिंहस्थ कुंभमेळ्याचे मार्केटिंग करू.

काय हवंय नाशिककरांना?

 1. किमान दोन तास व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा

 2. नवीन नगरांमध्ये पाणीपुरवठ्याची सोय

 3. शहरात सर्वत्र दोन इंची नळजोडणी

 4. जलकुंभांची निर्मिती व्हावी

 5. रात्रपाळीची स्वच्छता

 6. सार्वजनिक ठिकाणी १२ तास स्वच्छता

 7. मोकळे भूखंड स्वच्छतेसाठी विशेष मोहीम

 8. प्लॅस्टिक वापरावर बंदी

 9. महिलांना रोजगारासाठी प्रशिक्षण

 10. महापालिकेचे व्यावसायिक संकुल महिला बचतगटांसाठी

 11. मुख्य बाजारपेठेते महिलांसाठी आरक्षित जागा

 12. बिले वाटपासाठी महिलांची नियुक्ती

 13. दर दोन किलोमीटरवर स्वच्छतागृहे

 14. महिला बचतगट किंवा महिलांच्या माध्यमातून स्वच्छतागृहे चालवावीत

 15. महिलांच्या सर्व आजारांच्या उपचारासाठी शहरात एक स्वतंत्र रुग्णालय

 16. प्राथमिक व माध्यमिक शाळांची गुणवत्ता सुधारावी

 17. महापालिकेमार्फत सीबीएसई पॅटर्नच्या शाळा

 18. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत

 19. सोसायट्यांना सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक

 20. शहरातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण हटवावे

 21. प्रभागनिहाय भाजी मंडई

 22. नवनगरांमध्ये ड्रेनेज पाइपलाइन

 23. मनपाच्या संकुलामधील गाळे आयटी

हेही वाचा: देशात यावर्षीच्या मॉन्सून पावसाने ६१ वर्षांचा विक्रम मोडला

उद्योगांसाठी द्यावेत

 1. विभागनिहाय क्रीडांगणे

 2. शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम व्हावे

 3. होळकर पूल ते सोमेश्वरदरम्यान बोट प्रवास

 4. तपोवन, सोमेश्वर, मुक्तिधाम, पांडवलेणी येथे मनोरंजन केंद्र

 5. पर्यटन माहिती केंद्राची निर्मिती

 6. पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी स्वतंत्र बस

 7. स्पर्धा परीक्षांसाठी प्रभागनिहाय केंद्र

 8. वाचन संस्कृती वाढीसाठी विभागनिहाय वाचनालय

 9. डिजिटल लायब्ररी, तसेच फिरते वाचनालय

 10. सर्व महापुरुषांचे पुतळे असलेले एकच पुतळा उद्यान

 11. अंतर्गत व बाह्य रिंग रोड विकसित करावेत

 12. टायर बेस्ट मेट्रोच्या स्थानकांजवळ व्यापारी संकुल

 13. ट्रक टर्मिनस विकसित करावे

 14. अवजड वाहनांना शहरात रात्री प्रवेश

 15. भिकाऱ्यांचा बंदोबस्त, निवारागृहात स्थलांतरण

 16. दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था

 17. गंगाघाटावर खुले चित्रपटगृह

 18. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तयार करावे

 19. तंबाखू, सिगारेट, मद्य नशामुक्ती केंद्राची स्थापना

हेही वाचा: नाशिक : निफाड तालुक्यात पावसाने मोडला पाच वर्षांचा विक्रम

मनसेच्या सत्ताकाळातील प्रकल्पांची वाताहत नंतरच्या सत्ताकाळात झाली. पुन्हा सत्ता आल्यास प्रकल्पांना पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून देऊ.

-दिलीप दातीर,

शहराध्यक्ष, मनसे

नाशिककरांच्या जाहीरनाम्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी प्रामुख्याने केली आहे. मनसेचे पदाधिकारी त्यांच्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहेत.

-अंकुश पवार, जिल्हाध्यक्ष, मनसे

स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळावा, यासाठी मनसेचे प्रयत्न आहेत. साथीच्या आजारांवर नियंत्रण नसल्याने मोठ्या प्रमाणात आजारांना निमंत्रण मिळत आहे. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्यसेवा सुधारण्याला प्राधान्य राहील.

-योगेश शेवरे, सभापती, सातपूर प्रभाग समिती

महापालिकेत मनसेची सत्ता असताना, रस्ते विकासाला प्राधान्य दिले होते. त्याकाळी तयार झालेले रस्ते अद्यापही सुस्थितीत आहेत. मात्र, नंतरच्या सत्ताकाळात तयार झालेल्या रस्त्यांची वाताहत झाली आहे.

-ॲड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष, मनसे

शहरात पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. सत्ता आल्यास ही समस्या सोडविण्यास प्राधान्य देऊ. मनसेच्या काळात उभारलेले इतिहासकालीन शस्रसंग्रहालय खासगी संस्थेकडे चालविण्यास देऊ.

-सचिन भोसले, समन्वयक, मनसे

वाचनसंस्कृती शहराची ओळख आहे. मात्र, ही ओळख पुसली जात असून, मनसेतर्फे मुख्य चौक, रस्त्यांवर वाचनालये उभारून वाचन चळवळ उभी केली जाईल.

-सत्यम खंडाळे, विभाग अध्यक्ष

औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांमधून बाहेर पडणारे रसायनयुक्त पाणी नदीत सोडले जात असल्याने जलप्रदूषण होते. त्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एसटीपी प्लांट उभारण्याची आवश्‍यकता आहे.

-योगेश लभडे, विभाग अध्यक्ष

loading image
go to top