नाशिक : निफाड तालुक्यात पावसाने मोडला पाच वर्षांचा विक्रम

परतीच्या पाऊस अजूनही वाजतगाजत सुरू असताना निफाड तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक हजारी लावत गेली पाच वर्षाचा विक्रम मोडला आहे.
Rain
RainSakal

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : परतीच्या पाऊस अजूनही वाजतगाजत सुरू असताना निफाड तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक हजारी लावत गेली पाच वर्षाचा विक्रम मोडला आहे. निफाड तालुक्यात आतापर्यत चार महिन्यात ५५८ मिलिमीटर म्हणजे ११६ टक्के पावसाची बरसात झाली आहे. अजूनही पावसाचा मुक्काम कायम असल्याने यात वाढ होणार आहे. विक्रमी पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा व शेतीसिंचनाचा प्रश्‍न यंदा मार्गी लागला असला तरी शेतीपिकांची मोठी नासाडी धो-धो बरसलेल्या पावसाने केली आहे.


निफाड तालुका तसा हमखास पावसाचा परिसर म्हणून ओळखला जातो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी ४८० मिलिमीटर पाऊस दरवर्षी होत असतो. गेली दोन वर्षे मात्र पावसाने वक्रदृष्टीने केल्याने टंचाईचा सामना निफाड तालुक्याला करावा लागला होता. सन २०१६ पासनू पावसाचे प्रमाण काहीसे घसरले आहे. यंदा मात्र पावसाने लेट पण थेट एन्ट्री केली. दिर्घ विश्रांतीनंतर दमदार बॅटींग करत पावसाने निफाड तालुका अक्षरशा झोडपून काढला. सरासरीच्या तुलनेत आतापर्यत तब्बल ११६ टक्के पावसाचे नोंद झाली आहे.

ओला दुष्काळाची स्थिती निफाडच्या पूर्व भागात निर्माण झाली आहे. अजूनही पावसाने परतीची वाट धरलेली दिसत नाही. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात हिट ऐवजी पाऊस कुल करणार असे दिसते. पावसाच्या अतिमेहरबाणीमुळे द्राक्षउत्पादक धास्तावले आहेत. द्राक्ष हंगामासाठी महत्त्वाची असलेली फळधारणा छाटणी पावसाच्या कचाट्यात अडकली आहे. काढणीला आलेले सोयाबीनचे पीक पावसामुळे सडू लागले आहे.

Rain
डोळ्यांसमोर जन्मदात्रीचा अंत; चिमुरड्यांच्या आकांताने परिसर सुन्न
Rain
आधार कार्ड आता स्वतःलाच करता येईल अपडेट, ही आहे सोपी प्रोसेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com