
Nashik Crime News : मनसे महिला जिल्हाध्यक्षांच्या रक्षकांकडे एअरगन
नाशिक : शिवजयंती मिरवणुकीमध्ये मनसेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षांच्या सुरक्षारक्षकांकडे बेकायदेशीरपण एअरगन आढळून आल्या. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने या गन ताब्यात घेतल्या असून दोघा सुरक्षा रक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. (MNS women district president bodyguards air gun Nashik crime News)
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
भद्रकाली येथील वाकडीबारव येथून पारंपारिक पद्धतीने शिवजयंती मिरवणुकीला प्रारंभ झाली. मिरवणुकीत मनसेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा स्वागता उपासनी यांच्या दोघा सुरक्षारक्षकांकडे एअरगन होत्या.
ही बाब शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चौकशी केली. दोघांना ताब्यात घेत भद्रकाली पोलिस ठाण्यामध्ये आणण्यात आले. दोन एअर गन्स जप्त करण्यात आल्या. याबाबत रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती.