Nashik Crime : अट्टल मोबाईल स्नॅचर्स टोळी जेरबंद; महागडे 46 मोबाईल हस्तगत

Crime News
Crime Newsesakal

Nashik Crime : उपनगरीय परिसरात सायंकाळी व रात्री रस्त्याच्या कडेने मोबाईलवर बोलत जाणाऱ्यांना हेरून त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पोबारा करणाऱ्या टोळीच्या उपनगर पोलिसांनी शिताफीने मुसक्या आवळल्या.

पाच जणांच्या टोळीत दोघे अल्पवयीन असून, त्यांच्याकडून हिसकावलेले ४६ मोबाईल जप्त केले आहेत. संशयित हे सिन्नरमधील असून, नाशिक व नाशिक ग्रामीणसह शिर्डी, राहाता, संगमनेर या शहरांमध्येही त्यांनी मोबाईल स्नॅचिंग केली आहे.

संशयितांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, चौकशीतून आणखीही गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे. (mobile snatchers gang jailed seized expensive 46 mobiles Nashik Crime)

आकाश भगवात राठोड (२१, रा. नायगाव रोड, तळवाडे, सिन्नर), अभिषेक मच्छिंद्र शेळके (२६, रा. हिराबाई देशमुख ग्रामपंचायतीशेजारी, सिन्नर), अनिकेत सुभाष शेळके (२०, रा. संजीवनीनगर, अश्‍विनी बाबा चौक, सिन्नर) अशी संशयितांची नावे आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरामध्ये चैनस्नॅचिंगसह मोबाईल स्नॅचिंग करण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात वाढले होते.

विशेषत: चोरट्यांकडून सायंकाळ आणि रात्रीच्या मोबाईल खेचून नेत जबरी चोरी केली जात होती. त्यादृष्टीने शहर गुन्हेशाखेचे पोलीस ठाण्याचे गुन्हेशोध पथकांकडून संशतियांचा शोध सुरू होता.

उपनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी व कॉन्स्टेबल गौरव गवळी यांना मोबाईल स्नॅचर्सबाबत खबर मिळाली होती. त्यानुसार उपनगर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्रीपासून सिन्नरमधील आडवा रोड येथे सापळा रचला.

बुधवारी (ता. ७) पहाटेच्या सुमारास मोटारसायकलवरून (एमएच १७ सीयु ५२३८) संशयित आला असता, त्यास अडवून पोलिसांच्या त्याच्याकडील बॅगेची तपासणी केली असता, त्यात एकापेक्षा जास्त मोबाईल असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरलेले ४६ मोबाईल जप्त करण्यात आले. यामध्ये ३ ॲपल कंपनीचे आयफोनसह सॅमसंग, रेडमीसह महागडे मोबाईल आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Nashik Bribe Crime : सहायक फौजदार विजय शिंदेना लाच घेताना अटक

तिघा संशयितांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर अल्पवयीन संशयितांना बाल न्यायालयात हजर करण्यात आले.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्‌छाव, परिमंडळ दोनचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त अंबादास भुसारे, उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, हवालदार विजय लखन, गौरव गवळी, अनिल शिंदे, जयंत शिंदे, सुरज गवळी, कर्पे, राहुल जगताप, शिरसाठ, लोंढे यांच्या पथकाने बजावली.

सायंकाळनंतर करायचे गुन्हे

पाचही संशयित दुचाक्यांवरून नाशिकमध्ये यायचे. सायंकाळनंतर ते शहराच्या मध्यवस्ती वगळता आडरस्त्यावर मोबाईल बोलत असलेल्या व्यक्तींना हेरायचे. त्यानंतर ते त्यांच्या हातातील मोबाईल शिताफीने हिसकावून पोबारा करायचे.

याप्रमाणे, त्यांनी नाशिकसह जिल्ह्यात, आणि नगर जिल्ह्यातील शिर्डी, राहाता, संगमनेर या परिसरातही मोबाईल स्नॅचिंग करायचे. चोरलेले मोबाईल ते कमी किमतीमध्ये विकायचे.

Crime News
Jalgaon Crime News : वाहकाकडून महिलेची छेडखानी; बसमध्ये चढताना-उतरताना स्पर्श

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com