महिलेचा मोबाईल हिसकावून जीवे मारण्याची धमकी

महिलेचा मोबाईल हिसकावून जीवे मारण्याची धमकी
Published on: 
मोबाईल हिसकावून जीवे मारण्याची धमकी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : पूर्वाश्रमीच्या वादातून आणि दाखल गुन्ह्याचा राग मनात धरून संशयित युवकाने पीडितेच्या कार्यालयात घुसून वाद घातला. तिचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेत जीवे मारण्याची धमकी दिली; तसेच मोबाईलमधील व्हॉट्सॲपवर बदनामीकारक स्टेटस ठेवून तिची बदनामी केली. सदरची घटना गोविंदनगर भागातील एका खासगी कार्यालयात घडली असून, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागेश निळकंठ स्वामी (वय २८, रा. लक्ष्मण टॉवर, ज्ञानेश्वर नगर, पाथर्डी फाटा, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटीतील ३६ वर्षीय पीडितेच्या फिर्यादीनुसार, नागेशविरोधात यापूर्वीच अंबड पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. याच कारणाचा राग मनात धरून बुधवारी (ता.२१) दुपारी कुरापत काढून त्याने शिवीगाळ केली. फिर्यादीने विरोध केला असता मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला व पतीला ठार मारेल, अशी धमकी पळून गेला. मोबाईल हिसकावल्यानंतर नागेशने त्याच मोबाईलमधील व्हॉट्सॲपचा वापर करून बदनामीकारक मजकूर स्टेटसवर ठेवला. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले असून, १ कोटी रुपयांची मागणी केली, असा आरोप करत पोलिस आणि फिर्यादीबाबत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला. यामुळे आपली बदनामी झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने अंबड पोलिसांत धाव घेतली. हवालदार रफिक शेख अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com