नाशिक- पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेतली. त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानकडून त्यास प्रत्युत्तर दिले जाऊ शकते.या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील सर्व राज्यांना बुधवारी (ता. ७) मॉक ड्रिल घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नाशिकमध्येही मॉक ड्रिल घेतले जाईल. जिल्हा प्रशासनातर्फे त्यासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली.