esakal | प्रयोगशील शेतकऱ्याच्या पाठीवर कृषिमंत्र्यांची कौतुकाची थाप! गावात चर्चेचा विषय
sakal

बोलून बातमी शोधा

dada  bhuse

प्रयोगशील शेतकऱ्याच्या पाठीवर कृषिमंत्र्यांची कौतुकाची थाप!

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि.नाशिक) : देवारपाडे (ता. मालेगाव) येथील कमलेश घुमरे याने आई-वडिलांचे कष्ट कसे कमी करता येतील, या हेतूने दोन कृषियंत्रे तयार केली. त्याने तयार केलेल्या कपाशी टोकण यंत्राची सर्वच प्रसारमाध्यमांनी दखल घेतल्यानंतर त्याची चर्चा व सर्वत्र कौतुकाचा वर्षाव झाला. कमलेशने मॉडिफाइड केलेला ट्रॅक्टर स्वतः भुसे यांनी चालवून पाहिला. (Modified-tractor-driven-by-Agriculture-Minister-dada-Bhuse-nashik-marathi-news)

प्रयोगशील शेतकऱ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप

या युवा शेतकऱ्याचा सन्मान म्हणून तालुक्याचा कृषी दिन नानाजी घुमरे यांच्या बांधावर झाला. पाठोपाठ गुरुवारी (ता. ८) कृषिमंत्री दादा भुसे यांनी अचानक दुपारी दोनला थेट कमलेशच्या घरी सदिच्छा भेट देत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. श्री. भुसे कुठलाही गाजावाजा न करता अचानक कमलेशच्या घरी दाखल झाले. कृषिमंत्र्यांनी केलेल्या सत्काराने कमलेश भारावून गेला. या वेळी माजी पंचायत समिती सदस्य अशोक शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री. भुसे कुठलाही गाजावाजा न करता अचानक कमलेशच्या घरी दाखल झाले. कमलेशने त्यांना कपाशी टोकण यंत्राचे प्रात्यक्षिक करून दाखविले. ऊन, वारा, पाऊस यापासून बचाव होण्यासाठी मॉडिफाइड केलेला ट्रॅक्टर स्वतः भुसे यांनी चालवून पाहिला. कमलेशने आतापर्यंत साकारलेले फवारणी यंत्र, टोकण यंत्र व मॉडिफाइड केलेल्या ट्रॅक्टरची सर्व माहिती भुसे यांनी जाणून घेतली. कमलेशच्या प्रयोगशीलतेचे व कृषियंत्राचे भुसे यांनी कौतुक केले. या संदर्भात त्यांनी राहुरी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांशी चर्चा केली. या कामाची दखल घेऊन कृषी क्षेत्रात या यंत्राचा जास्तीत जास्त वापर व भविष्यात कमलेशला मदत करण्याचे आश्‍वासन भुसे यांनी दिले. कमलेशसारख्या युवा होतकरू शेतकऱ्यांची राज्याला गरज आहे. कमलेशने साकारलेले विविध यंत्रे कृषी उपयोगी आहेत. त्याच्या आई-वडिलांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. या वेळी भिकन महाडिक, संभाजी घुमरे, अमोल महाडिक, गंभीर घुमरे, सुनील चिकने, एकनाथ घुमरे, दिलीप चिकने, रामभाऊ चिकने, मोहन मांडोळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: भुजबळांच्या चिमट्यांनी भाजप नेत्यांना ठसके!

हेही वाचा: आम्ही आरोग्यरक्षक! नाशिकच्या 3 महिलांनी सांभाळली आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी

loading image