PTH26B01928
मोहाचापाडा (ता. त्र्यंहकेश्वर) ः येथे बंधाऱ्याच्या जलपूजनप्रसंगी उपस्थित मंत्री नरहरी झिरवाळ, तहसीलदार शिवाजी गवळी, गुरुनंदन राव यांच्यासह मान्यवर.
३०-२
जलसंधारणांच्या कामासाठी
संस्थांचे योगदान महत्त्वाचे
---------
झिरवाळ ः मोहाचापाड्यात तलावाचे जलपूजन
---------
सकाळ वृतसेवा
पेठ, ता.१०: यंदाचा दुष्काळ १९७२ पेक्षाही जास्त तीव्रतेचा असण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याचा सामना करण्यासाठी सर्वच स्तरावरून जलसंधारणाच्या कामांचे नियोजन आवश्यक आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांचे योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.
कुंभाळे ग्रामपंचायतींतर्गत ‘हॅन्डस ऑन फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बोरीचीबारी येथे पाण्याची टाकी तसेच मोहाचापाडा येथील तलावाचे जलपूजन झिरवाळ यांच्या हस्ते झाले. शाळा खोली बांधकाम, स्मशानभूमी, सभामंडप, गावांतर्गत रस्ते आदी कामांचेही भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
बाजार समिती संचालक भास्कर गावित, फाउंडेशनचे संस्थापक गुरुनंदन राव, मोनजित मुखर्जी, संपत शेट्टी, रिताब्रजो मुखर्जी, तहसीलदार शिवाजी गवळी, गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी, गिरीश गावित, विलास अलबाड, रामदास गवळी, पद्माकर कामडी, संजय वाघ, सुधाकर राऊत, श्यामराव गावित, सरपंच मोहन कामडी, उपसरपंच अशोक भसरे, सदस्य सोमनाथ निकुळे, ग्रामपंचायत अधिकारी घनशाम सातपुते यांच्यासह तालुक्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सरपंच, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. रामदास शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. मनोहर आवारी यांनी आभार मानले.
-----------------