
Crime Update : पाठलाग करून विनयभंग, मारहाण; गुन्हा दाखल
नाशिक : खासगी ठिकाणी (Private Job) नोकरीला असताना झालेल्या ओळखीतून तरुणीने लग्नास नकार दिल्याने संशयिताने कारमध्ये बसवून विनयभंग (Molestation) करीत मारहाण (beating) केल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयितांविरुद्ध मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (molestation beating by stalking case Filed Nashik Latest Marathi Crime News)
फिर्यादीनुसार, तरुणी व संशयित शंतनू (२५) हे दोघे एकाच ठिकाणी कामाला आहेत. त्यातून त्यांची ओळख झाली. संशयित शंतनू याने तरुणीला लग्नाची मागणी घातली असता, तीने नकार दिला.
या रागातून संशयिताने तिचा सतत पाठलाग करून लग्नासाठी आग्रह धरू लागला. रविवारी (ता. १७) रात्री संशयिताने तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून अशोक मार्ग, हिरेनगर, द्वारका, पंचवटी, नाशिक रोड आदी परिसरात फिरवून तिचा विनयभंग करीत शिवीगाळ केली.
तसेच, मारहाण करीत जीवे मारण्याचीही धमकी दिली. यामुळे तरुणीच्या डाव्या डोळ्याखाली दुखापत झाली आहे. याप्रकरणी तरुणीने मुंबई नाका पोलिसात फिर्याद दिली असून, त्यानुसार विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक बाळू गिते हे करीत आहेत.