Nashik Crime News : रुई येथील युवतीचा विनयभंग; कुटुंबाला मारहाण

Molestation
Molestationesakal
Updated on

लासलगाव (जि. नाशिक) : रुई (ता. निफाड) येथील युवतीसह आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दाखवून बळजबरीने विवाह केला. नांदावयास न गेल्याने गुंडांच्या टोळक्याच्या मदतीने शस्त्राचा धाक दाखवून दहशत माजवून विनयभंग केल्याप्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सात जणांना पोलिसांनी अटक करण्यात आली असून २ डिसेंबरपर्यंत कोठडी मिळाली आहे. (molestation of young woman in Rui Beating family Nashik Latest Crime News)

हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

Molestation
Ambad Kardile Case : मुंबईतून फॉरेन्सिकचे तज्ज्ञ पथक पाचारण; तपास काही लागेना

लासलगाव पोलिस ठाण्यात पिडितेने दिलेल्या फिर्यादीवरून सहा महिन्यापूर्वी संदीप काशिनाथ नागरे (रा. डोंगरगाव) याच्याशी माझी मैत्री होऊन माझ्याबरोबर लग्न करण्यासाठी माझ्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. नाशिक येथे कॉलेजला बीएच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत असून नाशिक येथे भाड्याने रूम घेऊन राहते, माझ्याशी नाशिक येथील अशोक स्तंभावरील विवाह केंद्रात विवाह करून घेतला.

त्यानंतर मला माझा भाऊ रुई येथे घेऊन आला. २४ नोव्हेंबरला संदीप नागरे मला घेऊन जाण्यासाठी आला असता त्यांना नकार दिला. त्याच्यासोबत आलेले बापू नागरे, अर्जुन सानप, प्रसाद शेरेकर, (सर्व रा. डोंगरगाव ), चंद्रकांत लुंकड (रा. लासलगाव) सागर वाघ (रा. नांदगाव) दिनेश तुपे व सोनाली तुपे (रा. नाशिक), प्रवीण सोनवणे (रा.गोंदे ,सिन्नर) व अनोळखी महिला घरी आले. त्यांनी आई-वडिलांना मारहाण सुरू केली. मला घराबाहेर ओढून आणले. मारहाण करून धमकी दिली.

Molestation
Nashik Crime News : शहरात 2 ठिकाणी घरफोड्या; साडेपाच लाखांचा ऐवज चोरीला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com