प्रेमासाठी वाटेल ते करण्याच्या नादात आला गोत्यात..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

money transfer

प्रेमासाठी वाटेल ते करण्याच्या नादात आला गोत्यात..!

सातपूर : प्रेयसीला ऑनलाइन पैसे (online money transfer) पाठविण्याच्या नादात तिच्या पतीच्याच खात्यावर पैसे ट्रान्स्फर झाल्याचा प्रकार सातपूरमधील एका कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बाबतीत घडला. या घटनेनंतर आपलं बिंग फुटू नये म्हणून हा अधिकारी आटापिटा करताना पाहायला मिळाला. दरम्यान, प्रेमासाठी वाटेल ते करण्याचा प्रयत्न तरुण करताना नेहमीच पाहायला मिळतात, पण पन्नाशीच्या वयातही प्रेमासाठी विविध क्लृप्त्या करतानाचा प्रकार सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये (Satpur MIDC) चर्चिला जात आहे. (Money Transfer by mistake to Girlfriend husbands account while sending money Nashik News)

एका कंपनीच्या वरिष्ठ पदावर असलेल्या हा अधिकारी भलताच कारणामुळे चर्चेत आला आहे, कारणही तसेच आहे. कोरोनानंतर मोठ्या प्रमाणावर कंपनीत महिला कर्मचाऱ्यांशी भरती करण्यात आली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याला तर गोकुळात नंदनवन अवतरल्यासारखे वाटते. असे या कंपनीतील कामगार खासगीत सांगतात. याच कंपनीत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याशी या अधिकाऱ्याने आपले जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले. संबंधित महिलाही काम सोडून तासनतास साहेबांच्या केबिनमध्येच जात- येत असे. अशी चर्चा कामगारांसह संपूर्ण कंपनीत आहे.

हेही वाचा: Nashik : विभागीय क्रीडा संकुलास अतिरिक्त 26 कोटी रुपये

याबाबत संबंधित महिलेच्या पतीलाही कुणकूण लागल्याने त्याने याबाबत चौकशीही सुरू केली होती व काम सोडून देण्याबाबतही महिलेला सांगितले होते. अशातच संबंधित महिला आठवड्यासाठी सुटीवर गेल्याने या दरम्यान संबंधित अधिकाऱ्याचा जीव टांगणीला लागला. खरच ही काम सोडून गेली का काय म्हणून तिला फोन करून विचारणा केली. यादरम्यान तब्येत भरी नसल्याने पैशांची अडचण आहे. तुम्ही दिले तर बर होईल, असे सांगितले. या वेळी अकाऊंट नंबर पाठवा लगेच पाठवतो, असे सांगितले. लगेचच घाईघाईने महिलेने बँकेचे पासबुकचा फोटो पाठवला. क्षणाचाही विलंब न करता या अधिकाऱ्याने हजारो रुपये खात्यात ऑनलाइन टाकले. तसा तो संदेश त्या महिलेच्या नवऱ्याचा मोबाईलवर गेला. मेसेज पाहून मी कोणाकडे पैसे मागितले नाही तरी एवढी मोठी रक्कम आली कशी असा विचार करत तो थेट बँकेत गेला व हे पैसे कोणी पाठवले याबाबत विचारणा केली. बँकेचा अधिकारीही हुशार होता त्याने नाव पाहून घेतले पण सर्व्हर डाऊन असल्याने तुम्ही नंतर या, असे सांगून वेळ मारली.

हेही वाचा: सिलिंडर दरवाढीचा आदिवासी भागात फटका; स्वयंपाकासाठी चुलींना पसंती

बिंग फुटू नये म्हणून धडपड

परंतु, त्याने थोड्याच वेळात या अधिकाऱ्याला फोन करून तुम्ही संबंधित खात्यावर पैसे पाठवले का, असे विचारणा करून संबंधित प्रकार सांगताच अधिकाऱ्याचे धाबे दणाणले. त्याने लगेचच प्रेयसीला फोन करून संबंधित प्रकार झाल्याचे सांगितले. यामुळे चुकून माझ्याऐवजी माझ्या पतीच्या पासबुकच्या फोटो पाठवला गेल्याची चुक लक्षात आली. पण वेळ निघून गेल्यामुळे जे नको घडायला तेच घडल्याने आपले बिंग फुटू नये म्हणून थेट बँकेत जाऊन माझ्या बायकोला पैसे पाठवत होतो पण चुकून दुसऱ्याच खात्यावर पाठवले गेल्याचे सांगून संबंधित महिलेच्या पतीचे विनवण्या करण्याची वेळ आल्याच पाहायला मिळाले.

Web Title: Money Transfer By Mistake To Girlfriend Husbands Account While Sending Money Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top