Nashik : विभागीय क्रीडा संकुलास अतिरिक्त २६ कोटी रुपये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Meeting of Divisional Sports Complex

Nashik : विभागीय क्रीडा संकुलास अतिरिक्त 26 कोटी रुपये

नाशिक : विभागीय क्रीडा संकुलाचा (Divisional Sports Complex) विस्तार आणि खेळाडूंना अत्याधुनिक सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर २६ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळणार आहे. त्यामुळे विभागीय क्रीडा संकुलाच्या विस्तारीकरणाच्या कामांचा सुधारित प्रस्ताव पाठवून प्रलंबित कामे गतीने करावी , अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. (Additional Rs 26 crore for Divisional Sports Complex Nashik Development News)

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सोमवारी (ता.९) विभागीय क्रीडा संकुलाची बैठक झाली. यावेळी श्री. भुजबळ बोलत होते. या प्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrishna Game), जिल्हाधिकारी गंगाथरन. डी (District Collector Gangadharan D.), जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महानगरपालिका आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner Ramesh Pawar), उपायुक्त प्रशासन रमेश काळे, क्रीडा व युवक सेवा नाशिक विभागाच्या उपसंचालक सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागूल, सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे उपस्थित होते.

श्री. भुजबळ म्हणाले, की विभागीय संकुलाच्या विस्तारीकरण व श्रेणीवाढ करण्याच्या अनुषंगाने संकुलाच्या बांधकाम योजनांच्या अनुदान मर्यादेत राज्यशासनाकडून वाढ करण्यात आली आहे. क्रीडा संकुलाची कामे करण्यासाठी जस जसा निधी उपलब्ध होईल त्याप्रमाणे तत्काळ कामे करण्यात यावी. तसेच संकुलाच्या निर्मितीकरिता पुरेशाप्रमाणात निधी उपलब्ध होण्यासाठी सचिवांशी चर्चा करण्यात आली असून, उर्वरित २६ कोटींच्या निधीचा आराखडा लवकरच सादर करण्यात यावा. तालुका, जिल्हा व विभागीय क्रीडा संकुले विकसित करताना हॉकी मैदान, शूटिंग रेंज यासारख्या खेळांचाही विचार करण्यात यावा.

हेही वाचा: ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात; ट्रक उलटून २३ मजूर जखमी

विभागीय क्रीडा संकुलाच्या बाजूची २९ एकर जागा क्रीडा प्रयोजनासाठी राखीव आहे. ही जागा विभागीय क्रीडा संकुलाला अधिक क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी उपलब्ध करून देण्याकरिता जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांनी समन्वयाने कार्यवाही करावी असेही श्री.भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: नाशिक : कसारा घाटात दुधाच्या टँकरला आग

तालुका पातळीवरील क्रीडा संकुलाचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने कसा होईल याबाबत क्रीडा विभागाने नियोजन करावे, जेणेकरून ग्रामीण भागातील खेळाडूंना चांगल्या प्रकारे लाभ घेता येईल, अशा सूचना कृषीमंत्री दादा भुसे (dadaji Bhuse) यांनी केल्या.

Web Title: Additional Rs 26 Crore For Divisional Sports Complex Nashik Development News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top