Nashik : Service Roadवर स्थानिक व्यावसायिकांची मक्तेदारी; अतिक्रमणामुळे अपघात

Panchavati Encroachment of businessmen on service road
Panchavati Encroachment of businessmen on service roadesakal

पंचवटी : पंचवटी परिसरातून जाणाऱ्या मुंबई- आग्रा महामार्गावरील लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय ते आडगावपर्यंत असलेल्या दोन्ही बाजूकडील सर्व्हिस रोडवर स्थानिक व्यावसायिकांची मक्तेदारी झाल्याने सर्व्हिस रोड हा नावालाच शिल्लक उरल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

महामार्गावरील दोन्ही बाजूंकडील अनेक कॉलनी रोड येऊन मिळतात. त्याचप्रमाणे शाळा महाविद्यालये व मंदिरे देखील आहेत. सर्व्हिस रोडला लागून असलेले ट्रान्स्पोर्ट गॅरेज हॉटेल असे अनेक व्यावसायिकांनी वाहने रोडवर अनधिकृत उभी करत असल्याने सर्व सामान्य प्रवासी व वाहनचालकांना मार्गक्रमण करताना अडचणींमध्ये अधिक भर पडते आहे.

मुंबई- आग्रा महामार्गावरील लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय ते सर्व्हिस रोडचा वापर हा वाहन पार्किंग व वाढलेले अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी व छोटे- मोठे अपघात होत असतात. सर्व्हिस रोडला लागून पंचवटी कॉलेज, कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालय, अपोलो हॉस्पिटल, स्वामिनारायण मंदिर आहेत. (Monopoly of local businessmen on service roads Difficulties in routing for passengers drivers Accident due to encroachment Nashik News)

Panchavati Encroachment of businessmen on service road
Nashik : सिडकोवासीय उभारणार जनआंदोलन

तसेच स्वामिनारायण नगर, सावता माळी नगर, विजयनगर कॉलनी, अमृतधाम, विडी कामगार नगर, जत्रा हॉटेल लिंक रोड, हनुमान नगर, कोणार्कनगर अशा विविध कॉलनी परिसरात जाण्यासाठी या सर्व्हिस रोडचा वापर केला जातो. मात्र, सर्व्हिस रोडला लागून असलेल्या गॅरेज, हॉटेल, ढाबे, ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांनी आपले बस्तान बसविले आहेत. प्रामुख्याने गॅरेज व्यावसायिकांनी तर सर्व्हिस रोडवर वाहन दुरुस्तीची कामे करत असल्याने निम्म्याहून अधिक जागा व्यापल्याचे चित्र दिसून येते. ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक तर आपली वाहने भररस्त्यात पार्क करत असतात. अनेक लहान- मोठे दुकानांसह हॉटेल्स व ढाबे चालकदेखील वाहने सर्व्हिस रोडवर पार्क करतात.

वाहतूक शाखेचे दुर्लक्ष

पोलिस आयुक्तालयांतर्गत वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी शहरात विभागनिहाय वाहतूक शाखेचे युनिट तयार करण्यात आले आहे. पंचवटी विभागासाठी औरंगाबाद नाका येथे वाहतूक शाखा युनिट एक निर्मिती करण्यात आली असून, अधिकारी व कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे. या वाहतूक शाखा युनिटकडून सर्व्हिस रोडवर होणाऱ्या गॅरेज, हॉटेल, ढाबेचालक यांची सुरू असलेली अनधिकृत पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी व छोटे मोठे अपघात रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

"सर्व्हिस रोडवर लागलेल्या वाहनांमुळे मार्गक्रमण करताना अडचणींना सामोरे जावे लागते. पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करीत योग्य ती कायदेशीर कारवाई करावी."

- सनी थोरात, दुचाकीचालक

Panchavati Encroachment of businessmen on service road
Chhagan Bhujbal Taunting Statement : गुजरातला Foxconn अन महाराष्ट्राला Popcorn

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com