जुने नाशिक- आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने आपली पूर्वतयारी वेगात सुरू केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत तोंड देण्यासाठी विभागातील विविध यंत्रसामग्रीची तपासणी, देखभाल आणि दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे.