Monsoon Train Timetable: उत्तर भारतासह राज्यात होणाऱ्या पावसाने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

Passengers stranded at Railway Junction station
Passengers stranded at Railway Junction stationesakal

Monsoon Train Timetable : उत्तर भारतासह राज्यात होणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर झाला आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या आणि मुंबईहून जाणाऱ्या, तसेच दक्षिण भारतात जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्या दोन ते २२ तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

सर्वच गाड्या उशिराने धावत असल्याने मनमाड रेल्वेस्थानकात प्रवासी अडकल्याचे चित्र आहे. (Monsoon Rains in state including North India have disrupted train schedule nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

esakal
Passengers stranded at Railway Junction station
Nashik Onion Subsidy: जिल्ह्यातील 40 हजारांवर अर्ज कांदा अनुदानासाठी अपात्र

पावसामुळे मध्य रेल्वे विभागातून धावणाऱ्या सर्व गाड्या उशिराने धावत असल्याने भुसावळ विभागातील महत्त्वाचे जंक्शन स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक एक, दोन आणि तीन, चार या फलाटावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळाली. सर्वच गाड्या उशिराने धावत असल्याने परप्रांतात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे.

उशिराने धावत असलेल्या गाड्या

गोरखपूर- कुर्ला कुशीनगर सुपरफास्ट एक्स्प्रेस एक तास, गोरखपूर- कुर्ला सुपर पाच तास, शालिमार- कुर्ला एक्स्प्रेस तीन तास ५० मिनिटे, पुणे- हटिया तीन तास, कुर्ला- वाराणसी दोन तास ४० मिनिटे, कुर्ला-पटना जनता एक्स्प्रेस दोन तास,

एरलाकुलन- निजामुद्दीन मंगला सुपरफास्ट एक्स्प्रेस चार तास ३७ मिनिटे, मुंबई- नागपूर सेवाग्राम सुपरफास्ट एक्स्प्रेस दोन तास ३० मिनिटे, हावडा-पुणे आझाद हिंद सुपरफास्ट एक्स्प्रेस २१ तास ४० मिनिटे, गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस एक तास, दानापूर- पुणे एक तास ४५ मिनिटे, नागपूर- पुणे एक तास ३० मिनिटे उशिरा धावत आहेत.

Passengers stranded at Railway Junction station
Nashik News: इगतपुरीत खड्डे उठले नागरिकांच्या जिवावर! वाहन चालविणे मुश्कील, मणक्याचाही वाढला त्रास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com