Monsoon Tourism: पर्यटकांची इगतपुरी, भंडारदऱ्यात गर्दी! रंधा फॉल, भावली धरणाचे आकर्षण

The gushing Randha Fall. Queues of vehicles in Bhandardara area.
The gushing Randha Fall. Queues of vehicles in Bhandardara area.esakal

Monsoon Tourism : तालुक्यासह परिसरात सध्या रिमझिम श्रावणसरी बरसत आहे. सगळीकडे हिरवाई झाली असून, तालुक्यातील धरणे, धबधबे वाहत आहेत. यामुळे पर्यटक व गिर्यारोहकांची गर्दी होत आहेत.

प्रवरा नदीवरील भंडारदरा धरण, रंधा फॉलला पर्यटकांची पसंती आहे. (Monsoon Tourism Crowd of tourists in Igatpuri Bhandardara Randha Fall Bhavli Dam attraction nashik)

नाशिक व नगर जिल्ह्याच्या सीमेलगत असणारे भंडारदरा धरण पर्यटकांचे प्रथम पसंतीचे स्थान आहे. दरवर्षी विविध ठिकाणांहून येथे भेट देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्दर्शकांचे आवडते स्थान आहे.

कित्येक हिंदी व मराठी चित्रपटांचे चित्रीकरण याच परिसरात झाले आहे. शेंडी गावापासून १० किलोमीटर अंतरावर असलेला विशाल धबधबा म्हणून रंधा फॉल म्हणून प्रसिद्ध आहे.

सध्या हा धबधबा धो-धो वाहत असून, त्यावर असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे फक्त पावसाळ्यातच पाहायला मिळतो. हा धबधबा वर्षभर वाहत नसतो. मात्र, पावसाळ्याच्या दिवसात धबधबा अतिशय रौद्ररूप धारण करत रोमांचित करणारा अनुभव करून देतो.

धबधब्याकडे जाताना लहान-मोठे धबधबे आणि डोंगररांगावरील कोसळणारे पाणी मन मोहून घेते. डोंगर-दऱ्यात पाण्याचा मनसोक्त आनंद पर्यटक परिवारासह घेत आहेत. दरम्यान, परिसरातील माळरानावर पावसाळ्यात बहरलेली वनराईच्या सानिध्यात जाऊन फोटो आणि सेल्फी घेण्याचा मोफ मात्र आवरता येत नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

The gushing Randha Fall. Queues of vehicles in Bhandardara area.
Monsoon Tourism: शहरात पर्यटकांची मांदियाळी..! बसस्‍थानकावर गर्दी, धार्मिक-निसर्ग पर्यटनाला चालना

व्यावसायिक साधताय पर्वणी

भंडारदरा धरणाकडे जाण्यासाठी एकमेव घोटी ते भंडारदरा रस्ता आहे. या राज्यमार्गावर असणाऱ्या हॉटेलांत या महिन्यात गर्दी वाढते. दरवर्षी या भागात सुट्यांच्या काळात वाहनांच्या दूरवर रांगा लागतात.

यामुळे हॉटेल व्यावसायिकांची जणू काही दिवाळीच असते. सध्या रस्त्यांची बिकट अवस्था पाहता यंदा पर्यटकांची संख्या मागील वर्षाप्रमाणे या वर्षी हवी तितकी दिसत नाही.

रस्त्याची दुरुस्ती लवकर नाही झाली, तर पुढील काळात पर्यटक खूप कमी संख्येत पाहायला मिळतील, अशी निराशाजनक प्रतिक्रिया हॉटेल व्यावसायिकांनी दिली.

The gushing Randha Fall. Queues of vehicles in Bhandardara area.
Nashik Monsoon Tourism: पावसाची उघडीप, पर्यटनस्थळे गजबजली! हुल्लडबाजांवर पोलिसांची नजर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com