नाशिक- जिवंत असताना व्यथा मांडणाऱ्याला समाजात आवाज मिळत नाही, हे आपण समजून घेतले आहे. पण, ज्यांच्या ओठांवर कायमची शांतता आहे, त्यांच्या सन्मानाचं काय? मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि त्या शेवटच्या प्रवासातही जर माणसाच्या सन्मानाशी आणि संवेदनांशी खेळ मांडला जात असेल, तर आपण समाज म्हणून कितीही प्रगत झालो, तरी आपल्यात माणुसकी उरली आहे का, हाच खरा प्रश्न आहे.