‘त्या’ दगडी फरशांवर शेवाळ; वाहनासह पादचारी पडताय घसरून

Workers removing moss from stone tiles.
Workers removing moss from stone tiles.esakal
Updated on

पंचवटी (जि. नाशिक) : सुशोभीकरणासाठी गोदापात्रात बसविण्यात येत असलेल्या दगडी फरशा कायम वादात राहिल्या आहेत. गोदावरीला पाणी वाढताच फरशा उखडणे, त्यांचे तुकडे पडणे, त्या प्रवाहात वाहने, हे प्रकार होत असताना, शनिवारी (ता. २७) गांधी तलावालगतच्या दगडी फरशांवरून अनेक वाहने व पादचारी घसरून पडले. या दगडी फरशांवर शेवाळ होणार नाही, असा दावा या घसरगुंडीच्या प्रकाराने फोल ठरला असल्याची चर्चा या परिसरात होती. (Moss on stone tiles at gandhi talav Pedestrian falling with vehicle nashik news)

Workers removing moss from stone tiles.
Ganeshotsav 2022 : गणेशभक्तांसाठी यंदाही ‘SAKAL’तर्फे अनोखी स्पर्धा

पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होता. तो विसर्ग शुक्रवारी (ता. २६) थांबविण्यात आला. त्यामुळे शनिवारी सकाळी गांधी तलाव, रामकुंड, यशवंतराव महाराज मंदिर पटांगण, एकमुखी दत्तमंदिर, चक्रधर स्वामी मंदिर या परिसरात दगडी फरशा बसविण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर शेवाळाचा थर जमा झाला. हा थर अत्यंत गुळगुळीत असल्याने त्यावरून पाय घसरून पडणे, वाहने घसरणे असे प्रकार सकाळपासून सुरू झाले.

या परिसरात सकाळी श्राद्धविधीसाठी बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. त्यांना या परिसराची माहिती नसल्याने या फरशांवरून घसरून पडण्याचे प्रकार घडत होते. या परिसरात सुरू झालेली घसरगुंडी बघून पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राभडिया, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांनी तत्काळ वॉटरग्रेस प्रोडक्टच्या ४५ कर्मचाऱ्यांमार्फत या परिसरात ब्लिचिंग पावडर टाकून दगडावर साचलेले शेवाळ काढले.

Workers removing moss from stone tiles.
Dhule : दोंडाईचा परिसरातील 12 गावांना पाणीटंचाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com