नाशिक : सातपूर ला गॅसचा भडका होरपळून आईचा मृत्यू तर मुलगी गंभीर जखमी | nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gas Explosion in satpur

सातपूर ला गॅसचा भडका होरपळून आईचा मृत्यू तर मुलगी गंभीर जखमी

सातपूर (जि. नाशिक) : राधाकृष्णनगर येथील सरोदे संकुलामध्ये बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास स्वयंपाक करत असताना गॅस सिलिंडरचा भडका होऊन आईचा मृत्यू तर मुलगी गंभीर भाजल्याची घटना घडली.

हेही वाचा: EV गाड्यांमधील आगीच्या घटना थांबेना; 80 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

बुधवारी (ता. २०) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अर्चना ललेंद्र सिंह (रा. सरोदे संकुल रु.न ५ वय ४०) या स्वयंपाक करत असताना गॅस नळीमधून गॅस लिकेज होऊन अचानक आगीचा भडका झाला. त्यामुळे आगीत अर्चना या ७५ टक्के भाजल्या गेल्या. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारा पूर्वीच त्यांचा मृत्यू झालेच डॉक्टरांनी घोषित केले. मुलगी हस्ता ललेंद्र सिंग (वय १६) ही देखील आगीत २० टक्के भाजली गेली. तिला अशोकनगर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अर्चना यांचे पती ललेंद्र सिंह यांनी आगीतून दोघींना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले होते. सातपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: पुरातन वृक्षांची डिजिटल नोंद घेणारी राज्यातली पहिली ग्रामपंचायत

Web Title: Mother Was Killed And Her Daughter Was Seriously Injured In A Gas Explosion In Satpur Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikdeathgas explosion
go to top