नामपूर- नामपूर शहरात काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या सातत्याने होणाऱ्या घटनांमुळे नागरिक कमालीचे भयभीत झाले असून, पोलिसांचा धाक कमी झाल्याने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून दुचाकी चोऱ्यांचा छडा लावावा, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे.