Nashik News: कठडा उद्यानाचे आरक्षण बदलण्याच्या हालचाली; डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाचे होणार विस्तारीकरण

dr zakir hussain hospital
dr zakir hussain hospitalesakal

Nashik News : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कठडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाचे विस्तारीकरण करताना पाचशे खाटांचे हॉस्पिटल उभारण्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार महापालिका प्रशासन अॅलर्ट मोडमध्ये आली आहे.

कठडा येथील उद्यानाचे आरक्षण बदलण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. (Moves to change Kathada Park reservation Dr Zakir Hussain Hospital will be expanded Nashik News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील माजी गटनेते गजानन शेलार यांनी एप्रिलमध्ये श्री. भुजबळ यांना निवेदन दिले होते. निवेदनाच्या माध्यमातून महापालिकेकडे भुजबळ यांनी मागणी केली.

कुंभमेळ्यासाठी डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाचा विस्तार करणे आवश्यक आहे. पंचवटीतील साधूग्रामजवळ असल्याने भाविकांच्या दृष्टीने हॉस्पिटल उपयुक्त ठरेल. मागील सिंहस्थामध्ये झाकिर हुसेन हॉस्पिटलचा चांगला उपयोग झाला.

परंतु रुग्णांना आवश्यक असलेली वैद्यकीय सेवा या हॉस्पिटलमधून मिळाली नाही. रुग्णालय महापालिका क्षेत्राच्या मध्यवर्ती भागात असल्याने त्याचप्रमाणे महामार्गाला लागून असल्याने नागरिकांना या हॉस्पिटलचा मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो.

आग्रा रोडवर अपघात झाल्यास अपघातातील जखमींना सुद्धा तत्काळ वैद्यकीय सेवा मिळू शकते व अपघातग्रस्तांना जीवदान मिळू शकते. जुने नाशिक, पंचवटी, द्वारका, टाकळी, वडाळा, सिडको व सभोवतालच्या नागरिकांना व यात्रेकरूंना रुग्णालयाचा चांगला लाभ मिळेल.

त्यासाठी हॉस्पिटलसाठी अधिक सुविधायुक्त आणि वाढीव ५०० खाटांचे करणे गरजेचे आहे. हॉस्पिटललगत महापालिकेची मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असून, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढीव खाटांचे हॉस्पिटल तयार करता येईल. अशा सूचना श्री. भुजबळ यांनी दिल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

dr zakir hussain hospital
Nashik News: BOT मिळकत विकासाला पुन्हा हवा

आणखी एक भव्य रुग्णालय

कठडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाला लागून उद्यान आहे. या उद्यानाची जागा रुग्णालय विस्तारीकरणासाठी उपयोगी पडणार आहे. त्यापूर्वी उद्यानाचे आरक्षण बदलून हॉस्पिटलसाठी आरक्षित असा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून घ्यावा लागणार आहे.

त्यासाठी उद्यान विभागाकडून महापालिकेच्या भूसंपादन विभागाला प्रस्ताव जाईल. भूसंपादन विभागाकडून महासभा व महासभेकडून आयुक्तांमार्फत राज्य शासनाला प्रस्ताव सादर होईल.

सदर प्रक्रिया जलदगतीने झाल्यास नाशिककरांना आणखी एक भव्य रुग्णालय उपलब्ध होईल. पंचवटी विभागामध्ये आमदार अॅड. राहुल ढिकले यांच्या माध्यमातून पाचशे खाटांचे रुग्णालय शासनाने मंजूर केले आहे.

‘मध्य’ची तयारी

डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय हे मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये आहे. त्यामुळे ५०० खाटांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने मध्य विधानसभा मतदारसंघात तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे.

यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी रुग्णालयाचा विस्तार करणे आवश्‍यक असल्याचे मत व्यक्त केले असून पाठपुरावा करून गोरगरिबांसाठी रुग्णालय लवकरच उभे करणार असल्याचे सांगितले.

dr zakir hussain hospital
Namami Goda Project: ‘नमामि गोदा’ प्रकल्प आराखडा ऑगस्टअखेर केंद्राला सादर होणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com