वणी - नाशिक-दिंडोरी-वणी- कळवण रस्ता चौपदरीकरण करण्याची आग्रही मागणी खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचेकडे केली आहे.
दिल्ली येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे उपस्थितीत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची खासदार भास्कर भगरे यांनी नाशिक-दिंडोरी-वणी-कळवण रस्त्याचे चौपदरीकरण, चेन्नई सुरत महामार्ग नाशिक आग्रा महामार्ग उड्डाणंपुल आदी सह मतदारसंघातील रस्ता प्रश्नावर भेट घेत सविस्तर चर्चा केली.