Narendra Modi : मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा वेगाने विकास : डॉ. सुभाष भामरे

Speaking at the press conference held here, MP Dr. Subhash Bhamre with others
Speaking at the press conference held here, MP Dr. Subhash Bhamre with others esakal

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य दिल्यामुळेच देशाचा विकास होऊ शकला.

संरक्षण सज्जतेसह उद्योग, कृषी, शिक्षण, महिला सक्षमीकरण पायाभूत सुविधांचा विकास, वैद्यकीय सुविधा, रेल्वेचे आधुनिकीकरण, राष्ट्रीय महामार्गाचे विणलेले जाळे आदींसह विविध क्षेत्रात देशाने प्रगती केली आहे. (MP Dr Subhash Bhamre statement about Rapid development of country under Modi leadership nashik news)

मोदींच्या नेतृत्वाखाली नऊ वर्षात देशाची अभूतपूर्व प्रगती झाली. त्यामुळेच भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था ठरत असल्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी येथे सांगितले.

येथील शासकीय विश्रामगृहावर खासदार भामरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कामकाजावर प्रकाशझोत टाकला. पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, मदन गायकवाड, हरिप्रसाद गुप्ता, नीलेश कचवे, देवा पाटील, लकी गिल, दादा जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. भामरे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देत देशाला प्रगतिपथावर नेले. गरिबांचे ४८ कोटी बँक खाते उघडत त्यांना बँकिंग प्रणालीत सामावून घेतले. विविध योजनांचा लाभ त्यांना मिळत आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत ८० कोटी लोकांना मोफत धान्याचे वाटप करण्यात आले.

तीन कोटी गरीब कुटुंबीयांना स्वतःची हक्काची घरे मिळाली. ११ कोटी ८ लाख घरांना नळांचे पाणी व वीज पोचविण्याचे काम पंतप्रधानांनी केले. शैक्षणिक क्षेत्रात ३९० नवीन विद्यापीठ, सात नवीन आयआयटीची स्थापना केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Speaking at the press conference held here, MP Dr. Subhash Bhamre with others
Narendra Modi : लोकसभा निवडणुकीत भाजप 350 जागा जिंकणार; उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

१५ एम्स व २२५ वैद्यकीय महाविद्यालय, तसेच १४ हजार ५०० शाळांचा विकास करण्यात आला. महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येऊन गॅस कनेक्शनसह विविध योजनांचा लाभ थेट महिलांना मिळू लागला आहे.

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचारासह आरोग्य विमा संरक्षण, ९ हजार ३०० केंद्रांवर स्वस्त औषधी, १.५९ लाखाहून अधिक आरोग्य केंद्र निर्माण करत वैद्यकीय पायाभूत सुविधांसाठी ६४ हजार १८० कोटींची तरतूद करण्यात आल्याने देशातील जनतेस वैद्यकीय उपचार सुलभतेने मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

रेल्वेचे आधुनिकीकरण करण्याबरोबर मेट्रोची सुविधा वीस शहरांमध्ये पोचली आहे. विमानतळांची संख्या ७४ वरून १४८ वर पोचली. राष्ट्रीय महामार्गांचा देखील झपाट्याने विस्तार होत आहे. डिजिटल व्यवहारात भारत जगात पहिल्या क्रमांकावर पोचला आहे.

सर्वच क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळेच भारत जगात सर्वात वेगाने वाढविणारी पाचवी अर्थव्यवस्था ठरत आहे. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी येथे प्रभू श्रीरामाचे मंदिर तसेच काशी विश्वनाथ व उज्जैन येथील महाकाल मंदिरात कॉरिडॉरचे बांधकाम साकारले जात असून सोमनाथ व केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार देखील होत आहे.

Speaking at the press conference held here, MP Dr. Subhash Bhamre with others
PM Modi : सोशल मीडियावर काँग्रेसचा हल्लाबोल, पंतप्रधान मोदींना केलं जातंय टार्गेट?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com