Hemant Godse : संसरी, चांदशीत विकासकामांसाठी सव्वापाच कोटीचा निधी मंजूर

MP Hemant Godse
MP Hemant Godseesakal

Hemant Godse : संसरी, चांदशीत विकासकामांसाठी सव्वापाच कोटीचा निधी मंजूर खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून नगरविकास विभागाने नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत संसरी आणि चांदशी या दोन गावांच्या विकासकामांसाठी सव्वा पाच कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. ( MP Hemant Godse fund of 55 crore approved for development of Sansari Chandshi village nashik news )

निधी उपलब्ध झाल्यामुळे चांदशी आणि संसरी या दोन गावांमधील विकासकामांना येत्या काही दिवसातच प्रत्यक्ष सुरवात होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी सांगितले.

संसरी येथील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे व नाल्याला वॉल कंपाउंड बांधणे तसेच चांदशीतील अंतर्गत रस्त्यांची सुधारणा करणे या कामांना निधी उपलब्ध करून देण्याची ग्रामस्थांची मागणी होती.

खासदार गोडसे यांनी राज्य शासनाकडे प्रयत्न करीत नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याने खासदार गोडसे यांनी त्यांची भेट घेत संसरी आणि चांदशी गावांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची त्यांना गळ घातली होती.

MP Hemant Godse
Nashik Onion News : कांदा भावात सर्वदूर घसरण न झाल्याने निर्यातबंदीची पिकवलेली अफवा ‘फेल’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संसरी आणि चांदशी या गावांच्या विकास कामासाठी सव्वापाच कोटींच्या निधीला मान्यता दिली आहे. पैकी संसरी गावासाठी २ कोटी ७२ लाख, तर चांदशी गावासाठी २ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी वापरण्यात येणार आहे.

प्राधिकरणाकडे स्वतंत्र असे तांत्रिक संवर्ग नसल्याने सदरची विकासकामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. खासदार गोडसे यांनी विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

MP Hemant Godse
Nashik News : जलशुद्धीकरण केंद्रात अज्ञात पाइपलाइन; जलजीवन मिशन उपक्रमात अनियमितताचा संशय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com