MPSC Exam
sakal
नाशिक: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुरुवारी (ता. ३०) रात्री उशिरा राज्यसेवा (मुख्य) परीक्षा २०२४ ची सर्वसाधारण गुणवत्तायादी जाहीर केली. या पार्श्वभूमीवर अर्जातील आरक्षणाच्या तांत्रिक मुद्यावरून मुलाखतीसाठी नाकारलेल्या उमेदवारांनी न्यायालयीन लढा देण्याचा आक्रमक पवित्रा घेतला. याचा परिणाम होऊन अंतिम निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.