Mrityunjay Din: शिवकालीन शस्त्रविद्येचे सादरीकरण; पाडवा पटांगणावर भारतीय व्यायामाचे प्रात्यक्षिके

A crowd gathers at Godatira to watch the Shiva period war art demonstration organized by the Municipal Corporation and the New Year Welcome Committee
A crowd gathers at Godatira to watch the Shiva period war art demonstration organized by the Municipal Corporation and the New Year Welcome Committeeesakal

Nashik News : नाशिक महानगर पालिका व नववर्ष स्वागत यात्रा समिती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांच्या चौथ्या दिवशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन म्हणजेच मृत्युंजय दिनानिमित्त तरुणांमध्ये स्वत्व जागरण करण्याच्या हेतुने शिवकालीन शस्त्र विद्या व भारतीय व्यायामाचे प्रात्यक्षिके सायंकाळी आणि शिवकालीन शस्त्रे प्रदर्शनी सकाळी ९ ते रात्री नऊ वाजेपर्यंत पाडवा पटांगण गोदाघाट येथे मांडण्यात आली होती. (Latest Nashik News)

(Mrityunjay Din Presentation of chhatrapati Shivaji maharaj period weaponry Indian Exercise Demonstrations at Padwa Patangan nashik news psl98)

‘शिवकालीन विविध प्रकारचे शस्त्रे’ आबालवृद्धांना जवळून बघता यावी व हाताळता यावी या उद्देशाने शस्त्रास्त्रांची प्रदर्शनी मांडण्यात आली होती. या शस्त्र प्रदर्शनात भाल्यांचे विविध प्रकार, पट्ट्यांचे विविध प्रकार, तलवारीचे विविध प्रकार, कुऱ्हाडीचे विविध प्रकार, चिलखत, वाघ नखे, विळे, खुरपे, कट्यारी व ढाली हे प्रदर्शनात मांडण्यात आले होते.(Latest Marathi News)

या शस्त्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन सकाळी ९ वाजता सव्यसाची गुरुकुलाचे लखन जाधव गुरुजी, दांडेकर दीक्षित तालीम संघाचे अध्यक्ष हिरामण नाना वाघ, महापालिका अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे यांच्या उपस्थितीत पार पडले या वेळी नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, समितीचे सचिव योगेश गर्गे, संघटक जयंत गायधनी व उपाध्यक्ष राजेश दरगोडे देखील उपस्थित होते.

लखन जाधव गुरुजी आणि त्यांचे विद्यार्थी यांनी सादर केली. यावेळी डॉ. विजयकुमार मुंढे, उपायुक्त नितीन नेर, शिवकुमार वंजारी उपस्थित होते त्याचबरोबर इस्कॉन नाशिकचे शिक्षाष्टकम् प्रभू, एसीबी नाशिकच्या शर्मिष्ठा घारगे,एसीबी उपायुक्त वैशाली पाटील, अर्थतज्ञ विनायक गोविलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

A crowd gathers at Godatira to watch the Shiva period war art demonstration organized by the Municipal Corporation and the New Year Welcome Committee
Central Railway Block : मध्य रेल्वेचा आता 28 ला ब्लॉक

कार्यक्रमात आज

चैत्र शुद्ध प्रतिपदा श्री शालिवाहन शके १९४५, शोभन संवत्सरारंभ म्हणजेच गुढीपाडवा हिंदू नववर्ष या मंगल पर्वाचे भव्य स्वागत करण्यासाठी नाशिक मधून श्री साक्षी गणपती मंदिर, भद्रकाली कारंजा, श्री काळाराम मंदिर, पूर्व दरवाजा आणि कौशल्यानगर रामवाडी या तीन ठिकाणावरून सकाळी ६.३१ मि. नववर्ष स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या तीनही यात्रांचा समारोप पाडवा पटांगण, दुतोंड्या मारुती शेजारी, गोदाघाट येथे संपन्न होणार आहे. नाशिककरांनी मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी होऊन नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

A crowd gathers at Godatira to watch the Shiva period war art demonstration organized by the Municipal Corporation and the New Year Welcome Committee
Abdul Sattar | नुकसानीच्या गांभिर्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार : कृषिमंत्री अब्दुल सत्तार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com