Agriculture Minister Abdul Sattar interacting with local farmers on Tuesday after inspecting the damaged grape crop.
Agriculture Minister Abdul Sattar interacting with local farmers on Tuesday after inspecting the damaged grape crop.esakal

Abdul Sattar | नुकसानीच्या गांभिर्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार : कृषिमंत्री अब्दुल सत्तार

नाशिक : निफाड तालुक्यात शनिवारी (ता. १८) वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे द्राक्ष, कांदा, गहू व मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी (ता. २१) तालुक्यात पाहणी केली.

नुकसानीचे मला गांभीर्य असून, मुख्यमंत्र्यांसमोर परिस्थिती मांडणार असल्याचे आश्‍वासनही त्यांनी या वेळी दिले. दरम्यान, कृषिमंत्र्यांनी धावता दौरा केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण होते. (Agriculture Minister Abdul Sattar statement on nashik daura CM will draw attention to seriousness of damage nashik news)

गेल्यावर्षीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्याची चौकशी करा. फक्त पंचनामे करून कागदी घोडे नाचवू नका, तर आम्हाला दिलासा द्या. अन्यथा सरळ गांजाची शेती करण्याची परवानगी द्या, असा संतप्त सूर शेतकऱ्यांशी चर्चेत पाहायला मिळाला.

कुंभारी (ता. निफाड) येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या घरासमोर झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी आपली हातबलता कृषिमंत्र्यांसमोर मांडली. राज्य सरकारने द्राक्ष पिकांना क्रॉप कव्हरसाठी अनुदान दिले असते, तर ही नुकसानीची वेळ आली नसती, अशी रोखठोक भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.

यावेळी कृषीमंत्र्यांसमोर जिल्हा बँकेची वसुली, विजेचे भारनियमन, बँकांची वसुली यासह व्यापाऱ्यांकडून होणारी लूट असे अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले. निफाड उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब घागरे यांच्यासह शिवसेनेचे भाऊलाल तांबडे, प्रकाश पाटील, द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामस्थांनी विविध मागण्यांची निवेदने कृषिमंत्र्यांना दिली. आमच्या समस्या जाणून घेत आम्हाला ठोस शब्द द्या, अशी भूमिका शेतकऱ्यांनी यावेळी मांडली. त्यावर कृषिमंत्री म्हणाले, अधिवेशन सुरू असल्याने तूर्तास काही आश्‍वासन देता येणार नाही. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ती मांडली जाईल. राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

Agriculture Minister Abdul Sattar interacting with local farmers on Tuesday after inspecting the damaged grape crop.
Weather Forecast : जिल्ह्याच्या काही भागात रविवारी पाऊस अथवा गारपिटीची शक्यता!

शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप

कृषिमंत्री मुळातच तब्बल तीन तास उशिरा आले. तेही टायर रोडने आले अन्‌ टायर रोडनेच गेले. शेतकऱ्यांच्या कुठल्याही व्यथा मनापासून समजून घेण्यापेक्षा ते एकटेच बोलत राहिले. कुठल्याही समस्येचा निराकरण त्यांनी केले नाही, तसेच कुठलेही आश्‍वासनही न देता, शेतकऱ्यांचा आवाजच दाबला.

आम्ही सहा महिन्यात काय केलं, मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतले हेच सांगत बसले. पण, शेतकऱ्याला काय मिळालं? कृषिमंत्र्यांना पाहणी दौरा करायचा होता, तर त्यांनी दिवसा यायला हवे होते. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी द्राक्ष, कांदा अशा सर्वच पिकांची पाहणी करायला हवी होती.

मात्र, ते इतर पिकांचे नुकसान न पाहताच निघून गेले. मी कसा प्रवास केला? मला कशा प्रवासात अडचणी झाल्या? हेच सांगत बसले. शेतकऱ्यांची व्यथा मनापासून का ऐकून घेतली नाही? असा संताप सवालही शेतकऱ्यांनी या वेळी विचारला.

गांजा लागवडीची परवानगी द्या

आमच्या सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. थोडीफार पिके वाचली, त्याला व्यापारी खरेदी करणार नाहीत. खरेदी केला, तर त्याला कवडीमोल भाव देतील. त्यामुळे आमचं जगणं मुश्किल झालं आहे. आमचा परिवार आता वाऱ्यावर आला आहे. आम्ही हतबल झालो आहोत. त्यामुळे आम्हाला गांजा लागवडीची परवानगी द्या, अशी संतप्त मागणी या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केली.

Agriculture Minister Abdul Sattar interacting with local farmers on Tuesday after inspecting the damaged grape crop.
Central Railway Block : मध्य रेल्वेचा आता 28 ला ब्लॉक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com