महावितरणाची ग्रामीण रुग्णालयावर कारवाई

ग्रामिण रुग्णालय वणी
ग्रामिण रुग्णालय वणीesakal
Updated on

वणी (जि. नाशिक) : वणी येथील ग्रामिण रुग्णालयाने वीज बील न भरल्याने महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडीत करुन कारवाई केल्याने वणी रुग्णालय रात्रभर अंधारात असल्याने रुग्णांना व प्रसुती आलेल्या महिलांना इतरत्र धावाधाव करावी लागल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान गेल्या वर्षाभरापासून ग्रामिण रुग्णालयात वैद्यकिय अधिक्षक नसून याबाबत व आरोग्य सुविधांबाबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार व विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी करुनही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

वणी ग्रामिण रुग्णालयास आलेले सव्वा लाखाचे बील न भरल्याने महावितरण कंपनीने पंधरा दिवसांपूर्वी ग्रामिण रुग्णालयास नोटीस दिली होती. मात्र याकडे रुग्णालय प्रशासनाने दुर्लक्ष करुन तरतुद न केल्याने बुधवारी ता. २५ रोजी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशाने रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडीत करुन कारवाई केली.

याबाबत ग्रामिण रुग्णालयातील प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्याने व याबाबत तातडीने वरीष्ठांना न कळविण्याने रुग्णालय रात्रभर आंधारात होते. यावेळी रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या तीन महिलांना व नातेवाईकांना प्रसुतीसाठी खाजगी रुग्णालयात धावाधाव करावी लागली.

सदरचा प्रकार सामाजिक कार्यकर्ते सतिश जाधव, माजी उपसरपंच मनोज शर्मा, विजय बर्डे व स्थानिक पत्रकारांना कळाल्यानंतर आरोग्य प्रशासन व महावितरण प्रशासनास याबाबत विचारणा करुन धारेवर धरल्यानंतर गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता थकलेले वीज बील तीन -चार दिवसांत भरणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितल्यानंतर विज पुरवठा पुर्ववत करण्यात आला.

ग्रामिण रुग्णालयाचा भोंगळ कारभार

गेल्या सव्वा वर्षापासून वणी ग्रामिण रुग्णालयाची वैद्यकिय अधिक्षकाची पद रिक्त असून प्रभारी वैद्यकिय अधिक्षकांची नेमणूक केली जात आहे. तात्पुर्त्या स्वरुपात नेमणूक केलेले सदरचे वैद्यकिय अधिक्षक आठ- पंधरा दिवसांतून प्रशासकीय कामासाठी काही वेळ उपस्थित राहून निघून जातात. तसेच येथे नेमणूकीस असलेले वैद्यकिय अधिकारीही ११ महिन्यांच्या करारावर नियुक्त्या आहेत.

ग्रामिण रुग्णालयाचेच आरोग्य बिघडले...

त्यामूळे रुग्णालयात जबाबदार अधिकारीच नसल्याने वणी ग्रामिण रुग्णालयाचेच आरोग्य बिघडले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्री (Union Health Minister) भारती पवार (Bharti Pawar) व विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे स्थानिक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करीत आहे. तसेच माघील महीन्यात किसान सभेच्यावतीने मोर्चाही काढण्यात आला होता.

ग्रामिण रुग्णालय वणी
रुग्णवाहिका दारात असूनही गर्भवतीची अवहेलना | Nashik

याबाबत जिल्हा शल्यचिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना याबाबत लोकप्रतिनिंधीनी बैठका घोतल्या तरी वणी ग्रामिण रुग्णालयात वैद्यकिय अधिक्षकांची नेमणूक होवू शकलेली नसून रुग्णांची परवड सुरुच आहे. आरोग्य मंत्री व विधानसभा अध्यक्षांच्याच मतदार संघातील एक संवेदनशील व महत्त्वाचे ग्रामि रुग्णालयाकडे लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाचे होत असलेल्या दुर्लक्षामूळे रुग्णांमध्ये व ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

ग्रामिण रुग्णालय वणी
नांदेड : एका परिचारिकेवर चालतेय ग्रामीण रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.
Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
MP Supriya Sule
Marathi News Esakal
www.esakal.com