एसटी डेपोत चोरीचा प्रयत्न फसला, कर्मचाऱ्यांवर कोयत्याने हल्ला

एसटी डेपोत चोरीचा प्रयत्न फसला, कर्मचाऱ्यांवर कोयत्याने हल्ला
Published on: 
एसटी डेपोत चोरीचा प्रयत्न फसला कर्मचाऱ्यांवर कोयत्याने हल्ला; गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता. ३ : एमएसआरटीसी वर्कशॉपमधील शिवाई ई- बस विभागाच्या डेपोत चोरीचा चोरीचा प्रयत्न कर्मचाऱ्यांनी उधळून लावला. संशयित चौघांनी कर्मचाऱ्यांना कोयता आणि लोखंडी रॉडने हल्ला करत धमकावल्याची घटना घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (ता.१) मध्यरात्री एनडी पटेल रोड, शिंगाडा तलाव परिसरातील एमएसआरटीसी वर्कशॉपमधील ट्रान्स्फॉर्मर रूमजवळ घटना घडली. आगार व्यवस्थापक अमेय श्रावगे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. संशयित भूषण आणि राहील नावाचे दोन तरुण तसेच त्यांच्यासोबत दोन अनोळखी तरुण डेपोच्या भिंतीवरून उडी मारून आत आले. त्यांच्याकडे धारदार कोयता आणि लोखंडी रॉड होते. डेपोतील साहित्य चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या या तरुणांना कर्मचाऱ्यांनी हटकले. त्यांनी शिवीगाळ करत धमकावण्यास सुरुवात केली. या वेळी कोयता हातात असलेल्या तरुणाने सुपरवायझर अंकुश चिखले यांच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चिखले यांनी वार चुकवला. दरम्यान, मागे थांबलेल्या अन्य तरुणांनी कर्मचाऱ्यांच्या दिशेने दगडफेक केली. पोलिस येतील, असे सांगत चौघेही डेपोच्या मागील बाजूस असलेल्या लेबर कोर्टच्या भिंतीवरून उडी मारून पळून गेले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली. यापूर्वीही अनेक वेळा येथील डेपोमध्ये, वायर, बॅटरी तसेच इतर साहित्य चोरी झाल्याचे प्रकार घडले आहेत. पोलिसांनी येथील गस्त वाढवावी. अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com