मालेगाव: धर्माच्या आधारावर विधानसभा निवडणूक जिंकल्याचा आरोप करीत माजी आमदार आसिफ शेख यांनी आमदार मुफ्ती इस्माईल यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात न्यायालयीन सुनावणी सुरू असताना, आमदार इस्माईल सातत्याने अनुपस्थित राहत असल्याने न्यायालयाने त्यांना दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे, अशी माहिती शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.