Education : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या लेखी परीक्षेला सुरवात

MUHS latest marathi news
MUHS latest marathi newsesakal

नाशिक : महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्‍या (Maharashtra University of Health Sciences) उन्‍हाळी सत्र २०२२ च्‍या दुसऱ्या टप्‍यातील लेखी परीक्षेला (Written exam) सुरवात झाली आहे. शुक्रवार (ता.१५) पासून सुरू झालेल्‍या या परीक्षा ऑगस्‍टपर्यंत चालणार आहेत.

पदवी, पदव्‍युत्तर पदवीसह अन्‍य विविध शिक्षणक्रमांच्‍या पेपरचा यात समावेश आहे. राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत सुरु झाल्या असल्‍याचे विद्यापीठाने कळविले आहे. (MUHS Medical Courses Written Examination Begin Nashik latest Marathi news)

MUHS latest marathi news
OBC लोकसंख्या 54 % असून मिळावे हक्काचे 27 टक्के आरक्षण : छगन भुजबळ

विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू म्‍हणाले, की विविध शिक्षणक्रमाच्या लेखी परीक्षांना राज्यातील १६६ परीक्षा केंद्रांवर सुरळीतरित्या प्रारंभ झाला. पदवी अभ्यासक्रमाचे ४१ हजार २२६ आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे पाच हजार १०० विद्यार्थी या परीक्षेला शुक्रवारी उपस्‍थित होते.

विद्यार्थी हिताचा विचार करता निर्धारित वेळापत्रकानुसारच परीक्षा घेतली जाते आहे. सध्या राज्यात विविध ठिकाणी पाऊस सुरू असताना पुराच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्याबाबत परीक्षा केंद्रप्रमुखांना सूचना दिलेल्‍या आहेत.

पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व विद्याशाखा तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी व तत्सम विद्याशाखांच्या परीक्षा ४ ऑगस्‍टपर्यंत पार पडतील. तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या वैद्यकीय विद्याशाखेच्या परीक्षा यावर्षी मेमध्ये पार पडल्या आहेत.

MUHS latest marathi news
Nashik : सराफ व्यावसायिकाकडून ग्राहकाची फसवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com