
Nashik : सराफ व्यावसायिकाकडून ग्राहकाची फसवणूक
जुने नाशिक : काझीपुरा येथील संतोष ज्वेलर्स सराफ व्यावसायिकाने (Bullion dealer) ग्राहकाची १ लाख ६८ हजार ७०० रुपयाची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार शुक्रवार(ता. १५) दुपारी उघडकीस आला.
सराफ व्यावसायिक संतोष प्रभाकर बेदरकर यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. (Fraud of customers by bullion dealer nashik latest marathi crime news)
हेही वाचा: OBC लोकसंख्या 54 % असून मिळावे हक्काचे 27 टक्के आरक्षण : छगन भुजबळ
श्रीकृष्ण कोरडे यांना सोन्याची नवीन पोत तयार करण्यासाठी त्यांनी व्यावसायिक संतोष बेदरकर यांच्याकडे चौकशी केली. २२ जानेवारीस पुन्हा त्यांच्याकडे जाऊन सोन्याचा नेकलेस आणि अंगठी असे २१. ७ ग्रॅम वजनाचे सोने सराफ व्यावसायिकास दिले.
तसेच फोन पे द्वारे ३० हजाराची रक्कम दिली. त्यानंतर ३१ जानेवारीला ४० हजारांची रोख रक्कम फोन पेद्वारे व्यावसायिकाच्या खात्यावर वर्ग केली. त्याने एक महिन्याचा कालावधी पोत बनवण्यास लागणार असल्याचे सांगितले.
एक महिन्याची मुदत संपूनही त्याने पोत दिली नाही. श्री. कोरडे यांनी त्यास वारंवार फोन करून पोत देण्याची मागणी केली असता, टाळाटाळ केली. दुकानात गेले असता दुकान बंद आढळून आले. सात महिने होऊनदेखील पोत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. शुक्रवारी त्यांनी भद्रकाली पोलिसांत तक्रार दाखल केली.
हेही वाचा: NMC Election 2022 : अंतिम मतदारयादी प्रसिद्धीसाठी 21 जुलैपर्यंत मुदतवाढ
Web Title: Fraud Of Customers By Bullion Dealer Nashik Latest Marathi Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..