MUHS summer exam
sakal
नाशिक: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र-२०२५ च्या चौथ्या टप्प्यातील लेखी परीक्षांना मंगळवार (ता.९) पासून सुरवात होत आहे. विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांची परीक्षा २६ सप्टेंबरपर्यंत पार पडेल. राज्यातील एकूण १०७ परीक्षा केंद्रावर संचलित होणार आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षेच्या दिवशीच संबंधित विषयाची प्रश्नपत्रिका ऑनलाइन पद्धतीने परीक्षा केंद्रास उपलब्ध करून दिली जाणार आहे.