Latest Marathi News | मल्टिमॉडेल लॉजेस्टिक पार्क संपूर्णपणे केंद्राच्या अनुदानातून : डॉ. भारती पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bharati pawar News

Nashik | मल्टिमॉडेल लॉजेस्टिक पार्क संपूर्णपणे केंद्राच्या अनुदानातून : डॉ. भारती पवार

नाशिक : निफाड साखर कारखान्याच्या जागेवर होणारा मल्टिमॉडेल लॉजेस्टिक पार्क केंद्र सरकारच्या १०० टक्के अनुदानातून होणार आहे, असे असूनही निफाडचे आमदार ड्रायपोर्ट गुंडाळला गेले, असे सांगून जनतेची दिशाभूल करीत आहे, असा आरोप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केला. (Multimodal Logistics Park entirely funded by Centre statement by Dr Bharti Pawar Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: MNS Vs Rahul Gandhi : नाशिक रोड मनसेच्या वतीने बिटको चौकात राहुल गांधींचा निषेध

डॉ. पवार यांनी बुधवारी (ता. १६) जिल्ह्यातील प्रश्नाबाबत बैठक घेतली, त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. राज्यातील महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाल्यापासून नाशिकचे प्रकल्प मार्गी लागू लागले आहेत, फायली गतिमान होऊ लागल्या आहेत. मल्टिमॉडेल लॉजेस्टिक पार्क हा केंद्र शासनाचा महत्त्वांकाक्षी प्रकल्प असेल. जागेचा विषय मिटला आहे. टायटल क्लिअर जागेसाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन वर्षे वाया गेली. आता जागेचा विषय मार्गी लागल्याने रस्ते, रेल्वेच्या अतिरिक्त सुविधांची सोय असलेल्या या प्रकल्पासाठी सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) करण्याचे काम सुरू आहे.

आघाडी सरकारने दोन वर्षांत साधे जागेचे टायटल क्लिअरन्सचे काम केले नाही. जागा मिळवून देता आली नाही, त्यामुळे एक वेळ अशी आली होती, की पर्यायी खासगी जागेचा विचार सुरू झाला होता. निधी मिळायला लागले काम होऊ लागल्याचा दावा डॉ. पवार यांनी केला. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याच्या आरोपाला उत्तर देताना डॉ. पवार यांनी हा केवळ दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. उलट प्रत्येक जिल्ह्याला न्याय मिळू लागला आहे, असे सांगितले.

हेही वाचा: SAKAL Exclusive : डझनभर ठेकेदारांच्या भरवशावर अडीच हजार कोटींच्या योजना