MNS Vs Rahul Gandhi : नाशिक रोड मनसेच्या वतीने बिटको चौकात राहुल गांधींचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MNS Vs Rahul Gandhi

MNS Vs Rahul Gandhi : नाशिक रोड मनसेच्या वतीने बिटको चौकात राहुल गांधींचा निषेध

नाशिक रोड : येथील बिटको चौकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Savrakar) यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांचा मनसेच्या वतीने निषेध करून रास्ता रोको करण्यात आले.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा मोठा सहभाग असून त्यांचे योगदान संपूर्ण देशाला माहित आहे. तरी त्यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी अपशब्द वापरले यामुळे नाशिकचे भूमिपुत्र असलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल नाशिककरांना अत्यंत प्रेम आणि आधार असल्याने त्यांच्याबद्दल काढण्यात आलेल्या चुकीच्या शब्दांचा निषेध करण्यासाठी नाशिक रोड बिटको चौक येथे मनसेने राहुल गांधी यांच्या विरोधी घोषणा देऊन, राहुल गांधींनी आपले शब्द मागे घ्यावे व संपूर्ण देशाची माफी मागावी, अशी जाहीर मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली.

हेही वाचा: Nashik : पाथर्डी फाट्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर हातोडा!

या प्रसंगी नाशिकरोड विभाग अध्यक्ष विक्रम कदम, जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाणे व सुरेश घुगे कामगार सेना चिटणीस प्रकाश कोरडे, नाशिकपुर्व विधानसभा निरीक्षक प्रमोद साखरे, सहकार सेना प्रदेश उपाध्यक्ष रोहन देशपांडे, शहर उपाध्यक्ष विनायक पगारे ,महिला सेनेच्या शहर अध्यक्ष भानुमाती ताई अहिरे, रागिनीताई कोडे, विधी शाखेचे नितीन पंडित दत्ता कोठुळे, पुका गांगुर्डे, मनविसे प्रदेश सदस्य उमेश भोई, नितीन धानापुने, विजय पुरकर, शैलेश उदावंत, विजय बोराडे, मयूर रत्नपारखी, प्रसन्न जाधव आदि पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा: Nashik : वीज सुरक्षेसाठी अभियंत्याने रचले गीत; सावधानतेची जाणीव होण्यासाठी जनजागृती