चांदवड: मुंबई- आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यातील आडगाव टप्पा शिवारात सोमवारी (ता. १८) पहाटे साडेपाचच्या सुमारास इंदूरहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी आरामदायी बसला टायर फुटल्याने आग लागली. वेळीच बसमधील सर्व प्रवासी खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले असून, बसच्या आतील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. बसमध्ये एकूण ३९ प्रवासी होते.