Crime
sakal
नाशिक: मुंबई-आग्रा महामार्गावरील गरवारे बसथांब्यानजीक शनिवारी (ता. १३) सकाळी दगडाने ठेचून खून करण्यात आलेल्या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदरील तरुण लेखानगर परिसरातील असून, तो रात्रीपासून बेपत्ता होता. दरम्यान, पत्नीचा प्रियकर व त्याच्या साथीदारांनी या तरुणाचा खून केल्याचे समोर आले. संशयित पत्नीला इंदिरानगर पोलिसांनी ताब्यात घेत संशयित प्रियकरास अहिल्यानगरमधून अटक करण्यात आली आहे.