जुने नाशिक- मुंबई नाका ते अशोक स्तंभ मार्ग कापण्यासाठी खरे तर पाच मिनिटे लागणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र वाहतूक कोंडी आणि सिग्नलमुळे बहुतांश वेळा अर्धा तास कालावधी लागत असतो. द्वारकाप्रमाणेच मुंबई नाका परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.