जुने नाशिक: मुंबई नाका परिसरातील उच्चभ्रू ठिकाणी असलेल्या व्यावसायिक संकुलात मसाज पार्लरच्या नावाखाली देह विक्री व्यवसाय सुरू होता. मध्यवर्ती गुन्हे शाखेने मसाज पार्लरवर कारवाई करत पाच पीडित महिलांची सुटका करत व्यवसाय करणाऱ्या संशयित महिलेसही ताब्यात घेण्यात आले. खुशबू परेश सुराणा असे संशयित महिलेचे नाव आहे. न्यायालयात उभे केले असता तिला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.