Crime
sakal
नाशिक/जुने नाशिक: मुंबई नाका परिसरात एमडी (मॅफेड्रॉन) विक्री करण्यासाठी आलेल्या संशयित तस्कराच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. संशयित एमडी तस्कराकडून ६५ हजार रुपये किमतीचे २१.५ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार, परिक्षेत्रनिहाय नेमलेल्या अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने या कारवाईने आपल्या कामाचा ‘शुभारंभ’ केला आहे.