Mundhegaon Chitranagari: मुंढेगाव चित्रनगरीचा प्रस्ताव मंत्रालयात धुळखात; नाशिककरांना 12 वर्षांपासून प्रतीक्षा

mantralay
mantralayesakal

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

Mundhegaon Chitranagari : चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांची जन्मभूमी असलेल्या नाशिक जिल्ह्यात मुंढेगाव येथे चित्रनगरी साकारण्यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने १२ वर्षांपूर्वी दिलेला प्रस्ताव आजही मंत्रालयात धुळखात पडून आहे.

या बारा वर्षांच्या कालखंडात विविध पक्षांचे सरकार आले आणि गेले; पण चित्रनगरीचे स्वप्न अद्याप साकार झाले नाही. आता तर त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चर्चा करण्यासाठीही वेळ मिळत नसल्याने नाशिककरांची अवहेलना सुरुच आहे. (Mundhegaon Chitranagari proposal pending in ministry Nashikkars been waiting for 12 years nashik news)

दादासाहेब फाळके यांच्या नावाने हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वोच्च पुरस्कार दिला जातो. आशिया खंडातील पहिला चित्रपट निर्माण करुन दादासाहेबांनी भारतीय चित्रपटसृष्टीची निर्मिती केली. जन्मभूमीत त्यांचे स्मारकही उभे राहिले; पण चित्रनगरीची प्रतीक्षा अद्याप संपलेली नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी २०१०-११ मध्ये नाशिक-मुंबई महामार्गावर मुंढेगावच्य हद्दीत सुमारे १०० एकर गायरान जागेवर चित्रनगरी साकारण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावेळी यासाठी साधारणत: ८० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता.

आता हा खर्च २०० कोटींवर पोचला आहे. दरम्यानच्या काळात सत्तांतर झाले आणि नवीन सकारच्या काळात या प्रस्तावाला गती मिळेल, असा विश्‍वास अ. भा. चित्रपट महामंडळाला वाटत होता. त्यामुळे महामंडळाने आपली मागणी लावून धरली.

तरीदेखील त्यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. कोरोना काळात नाशिकचे तत्कालिन जिल्हाधिकारी सूरज मांढरे व निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्या सकारात्मक प्रयत्नांतून नाशिकमध्ये मराठी मालिकांचे शुटिंग सुरु झाले.

त्यानंतर दरवर्षी हिंदी, मराठी चित्रपट व मालिकांचे शुटिंग या ठिकाणी होते. सद्यस्थितीत तीन मराठी मालिका, दोन चित्रपट व एका वेबसिरीजचे शुटिंग नाशिकच्या आसपास सुरु आहे.

अशा पार्श्‍वभूमीवर चित्रनगरी साकारल्यास नाशिकमधील कलाकारांना संधी तर मिळेलच, शिवाय दादासाहेब फाळकेंच्या भुमीत चित्रनगरी साकारल्याचा आनंदही मिळेल. पण, मुख्यमंत्री व सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

mantralay
Nashik ZP News: स्वयंसेवी संस्थांसाठी खुली झाली जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची दालने

मुंढेगावला चित्रनगरी साकारल्यास...

* स्थानिक कलाकारांना काम करण्याची संधी मिळेल

* मुंबईपासून जवळ असल्याने कलाकार नाशिकमध्ये येतील

* १० किलो मीटरच्या आत नैसर्गिक संपदा उपलब्ध

* डोंगर रांगा, मंदिर, दर्गा, चर्च या धार्मिक स्थळांसह शहर व खेडेगावांतही चित्रिकरण शक्य

* नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे प्रशिक्षण केंद्र सुरु होऊ शकते.

"चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जन्मभूमीत चित्रनगरी उभी रहावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. नाशिकला निसर्गसंपदा लाभली आहे. समृद्धी महामार्ग, सूरत- चेन्नई महामार्गाच्या माध्यमातून नाशिक जोडले जाणार आहे. शिवाय मुंबईपासून अगदी जवळ असल्यामुळे कलाकारांना नाशिकमध्ये येणे सोयीचे आहे. याचा विचार शासनाने करावा. येत्या दोन आठवड्यांत आम्ही मुख्यमंत्री व सांस्कृतीक कार्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत."

-शाम लोंढे, अध्यक्ष, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, नाशिक

mantralay
Water Crisis: मॉन्सूनच्या विलंबामुळे टंचाईच्या झळा बळावल्या; राज्यात 66 गावे अन 119 वाड्यांसाठी 31 टँकरची वाढ!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com